घरमुंबईरेल्वेचा रविवारी ब्लॉकवार

रेल्वेचा रविवारी ब्लॉकवार

Subscribe

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक ,पश्चिम रेल्वेचा रात्रिकालीन ब्लॉक

रेल्वे रूळांची दुरूस्ती आणि देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड कल्याण दिशेकडील धीम्या मार्गावर घेतला आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही. तर, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा ब्लॉक दरम्यान रद्द करण्यात येतील. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड यादरम्यान कल्याण दिशेकडील धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.२० ते ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

या ब्लॉकदरम्यान माटुंगाहून कल्याणदिशेकडे जाणारी धीमी लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड या स्थानकावर थांबतील. त्यानंतर धीम्या मार्गावर लोकल वळविण्यात येतील. ब्लॉक दरम्यान विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकावर लोकल सेवा उपलब्ध नसेल. तर हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुन्नाभट्टी/ वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. परिणामी सीएसएमटी – वाशी/ बेलापूर /पनवेल – सीएसएमटी आणि पनेवल – गोरेगाव या सर्व लोकल बंद असणार आहेत. या प्रवाशांसाठी कुर्ला ते पनवेल विशेष लोकल असणार आहे .

- Advertisement -

पश्चिमवर रात्रकालीन जम्बो ब्लॉॅक

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेतला नाही. मात्र, २८-२९ डिसेंबर रोजी मध्यरात्री वसई रोड ते विरारदरम्यान रात्रकालीन जम्बो ब्लॉॅक घेण्यात येईल. मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत चार तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान विरार दिशेकडील सर्व धीम्या लोकल विरार ते वसई दरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील.

- Advertisement -

विक्रोळी स्थानकात ट्रॅफिक ब्लॉक

मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते मुलुंड अप – डाऊन जलद मार्गावर रविवारी रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दादर / सीएसएमटी येथे येणार्‍या-जाणार्‍या मेल- एक्सप्रेस विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचवी – सहावी मार्गिकेवरून वळविण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -