घरमुंबईस्थानकांच्या प्रश्नांवरून सुप्रिया सुळेंनी केली रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा

स्थानकांच्या प्रश्नांवरून सुप्रिया सुळेंनी केली रेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा

Subscribe

भास्कर नगर ते वाघोबा नगर पादचारी पूल, मुंब्रा रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि पारसिक रेल्वे स्टेशन आदींच्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये संबधित अधिकार्‍यांनी अनुकूलता दर्शविली आहे

रेतीबदंर पादचारी पुलाचे काम वेगवान पद्धतीने व्हावे, भास्कर नगर ते वाघोबा नगर पादचारी पूल, मुंब्रा रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि पारसिक रेल्वे स्टेशन आदींच्या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये संबधित अधिकार्‍यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच या चारही कामे लवकरच निकाली निघणार आहेत. कळवा- मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे गेल्या अनेक दिवसांपासून रेतीबदं पादचारी पुलासाठी प्रयत्नशील आहेत. या भागात रेल्वे रुळ ओलांडताना अपघात होत असल्याने त्यांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या भागातील पादचारी पूल मंजूर करण्यात आला आहे. या पुलाचे काम तसेच, भास्कर नगर ते वाघोबा नगर दरम्यान रेल्वे रुळांवर पादचारी पूल, मुंब्रा रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि पारसिक रेल्वे स्टेशन आदी मागण्या तत्काळ मंजूर करण्यासाठी दिल्ली येथील रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची विनंती आ. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना केली होती. त्यानुसार, सुप्रिया सुळे यांनी रेल्वे बोर्डाचे चेअरमेन अश्विनी लोहाना यांची भेट घेऊन सदर मागण्यांचे निवेदन दिले. तसेच, या मागण्या तत्काळ मान्य करुन त्या दृष्टीने कामाला सुरुवात करावी, अशी विनंती केली.

काय म्हणाल्यात सुळे

लोहाना यांनी खा. सुळे यांच्या या मागण्या मान्य केल्या असून लवकरच या मागण्यांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर, रेतीबंदर येथील पादचारी पुलाचे काम अत्यंत वेगवान पद्धतीने करण्यात येईल.
दरम्यान,आ.आव्हाड यांच्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पारसिक, खारीगाव करांची प्रलंबित असलेली पारसिक रेल्वे स्थानकाची मागणी आता रेल्वे मंत्रालयाच्या अजेंड्यावर आली असून लवकरच खारीगावकरांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -