घरमुंबईकचर्‍यापासून खत निर्मिती करणार्‍या सोसायट्यांची पाहणी

कचर्‍यापासून खत निर्मिती करणार्‍या सोसायट्यांची पाहणी

Subscribe

ज्याठिकाणी कचर्‍याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करण्यासोबतच मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होते अशा ठिकाणी ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया प्रकल्प राबवणे बंधनकारक असल्याने अनेक सोसायट्यांनी पुढाकार घेत आपल्या आवारातच ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली आहे. अशाचप्रकारे नेरुळ सेक्टर १६ येथील सी – ब्रीझ सोसायटीमधील रहिवाशांनी स्वच्छतेविषयी जागरुकता दाखवत कचर्‍यापासून खत निर्मिती कंपोस्ट पीट्स स्वरूपात राबवलेल्या खत निर्मिती प्रक्रिया प्रकल्पाला महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी भेट देऊन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच समाधान व्यक्त करत रहिवाशांचे कौतुक केले.

नेरुळ सेक्टर १६ येथील सी – ब्रीझ सोसायटीमध्ये १५ मजली १० इमारती असून त्यामध्ये २८० सदनिका आहेत. या सर्व सदनिकांमधील रहिवासी आपला दैनंदिन कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा करून ओल्या कचर्‍यावर सोसायटीच्या आवारातच कंपोस्ट पीट्सव्दारे प्रक्रिया करतात. यापासून तयार होणार्‍या खताचा उपयोग सोसायटीच्या आवारातील बगीचा फुलवण्यासाठी केला जातो. त्यामुळे सोसायटीचा घनकचरा हा प्रकल्प स्थळापर्यंत वाहून नेणे आणि त्यावर प्रक्रिया करणे टाळले जाऊन पर्यावरणाचेही रक्षण तसेच संवर्धन होणार आहे.

- Advertisement -

सोसायटीच्या आवारात १५ बाय ६ फूट आकाराचे तीन कंपोस्ट पीट्स तयार करण्यात आले असून, याकरिता स्त्रीमुक्ती संघटना या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ च्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध विभागांना भेट देऊन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. शहर स्वच्छतेचा बारकाईने आढावा घेत असून स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचा या अनुषंगाने चांगला सहभाग मिळत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सोसायटी, संस्था, उद्योगसमूह, हॉटेल्स आपल्या आवारातच खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्याकडे तसेच तो नियमित सुरू राहण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. ही समाधानाची बाब असल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक स्वच्छतेप्राणेच आपले नवी मुंबई शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -