Saturday, August 8, 2020
Mumbai
29 C
घर महामुंबई सुशांतच्या एक्स-मॅनेजरच्या मृत्यूशी संबंधित ते वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळलं

सुशांतच्या एक्स-मॅनेजरच्या मृत्यूशी संबंधित ते वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळलं

Mumbai
sushant singh ex manager disha salian

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचं गूढ आता आणखी वाढत चाललं आहे. अशातच सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन आणि सुशांतच्या मृत्यूचं कनेक्शन असल्याची चर्चा रंगली आहे. असं असताना दिशा सालियनच्या मृत्यूशी संबंधित फाईल्स डिलीट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र या प्रकरणाच्या फाईल्स डिलीट झाल्याचं वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळलं आहे.

इंडिय टू डेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. तर या प्रकरणातील नवनवे पैलू रोज समोर येत आहेत. यासाठी बिहार पोलीस देखील आता मुंबईत दाखल झाले आहेत.
दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यूचं काही कनेक्शन आहे का हे तपासण्यासाठी बिहार पोलीस शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात गेले होते. पंरतु दिशा सालियनशी संबंधित फाईल्सचं फोल्डर डिलीट झाल्याचं वृत्त समोर आलं. मात्र, दिशा सालियन संबंधित फाईल्स वव्यवस्थित असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हंटल आहे.

दरम्यान, बिहार पोलीस हे दिशाच्या कुटुंबियांची देखील चौकशी करणार आहेत. यासाठी जबाब नोंदवण्यासाठी पोलीस दिशाच्या घरी पोहोचले तेव्हा तिथे कोणी नव्हतं. सुशांतच्या मृत्यूपूर्वी ८ जूनला दिशाचा १४ व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर १४ जूनला सुशांत आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत अढळला. त्यामुळे आता हे प्रकरणाचा गूढ वाढला असून बिहार आणि मुंबई पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here