घरताज्या घडामोडीSushant Singh Suicide : सर्वोच्च न्यायालय मुंबई पोलिसांवर नाराज!

Sushant Singh Suicide : सर्वोच्च न्यायालय मुंबई पोलिसांवर नाराज!

Subscribe

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या राज्यात मनोरंजन विश्वासोबतच राजकीय विश्वात देखील आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यातच या प्रकरणी सुशांतच्या वडिलानी बिहारच्या पाटणामध्ये तक्रार दाखल केल्यामुळे बिहार पोलीस देखील मुंबईत तपासासाठी दाखल झाले आहेत. मात्र, वरीष्ठ पोलीस निरीक्षकांनाच क्वारंटाईन करण्यात आल्यामुळे या प्रकरणी मुंबई पोलिसांवर आणि मुंबई महानगर पालिकेवर देखील टीका करण्यात येत आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुबई पोलिसांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, बिहारच्या पोलिसांना क्वारंटाईन केल्यामुळे वेगळा मेसेज बाहेर गेला, असं देखील सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान नमूद केलं आहे.

का सुरू आहे सुनावणी?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, महाराष्ट्र सरकार यासाठी तयार नव्हतं. त्यामुळे अखेर बिहार सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मुंबई पोलीस प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम असून तपास योग्य दिशेने सुरू असल्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने मांडली होती. मात्र, आता या प्रकरणाचा तपास CBIकडे द्यायला राज्य सरकारची संमती असल्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्य सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. मात्र, या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

बिहार पोलिसांना क्वारंटाईन का केलं?

दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बिहार पोलिस दलालीत वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना क्वारंटाईन करण्याचा मुद्दा चर्चेला आल्यावर न्यायालयाने मुंबई पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. आधी आलेल्या बिहार पोलिसांच्या पथकाला क्वारंटाईन करण्यात आलं नव्हतं, मात्र, वरीष्ठ निरीक्षकांनाच फक्त क्वारंटाईन करण्यात आलं. यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं की, ‘मुबई पोलीस त्यांच्या प्रोफेशनल वर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्यामुळे सगळीकडे चुकीचा संदेश गेला’, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -