Saturday, August 8, 2020
Mumbai
29 C
घर मनोरंजन Sushant Sucide Case : ‘हे प्रकरण राजकीय वळण घेतंय’! – रोहित पवार

Sushant Sucide Case : ‘हे प्रकरण राजकीय वळण घेतंय’! – रोहित पवार

Mumbai

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर त्याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. या प्रकरणात आता बिहार पोलिसांनीही उडी घेतली आहे. सुरूवातीला बॉलीवूडमधील घराणेशाहीचा रंग आलेल्या या प्रकरणाला आता रिया चक्रवर्तीसोबतच्या प्रेमप्रकरणाचे वळण आले आहे. दरम्यान, या संबंधी अनेक राजकीय नेत्यांनी मत व्यक्त केले असून आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे. या सर्वावर आता आमदार रोहित पवार यांनीही शंका उतस्थित करत हे प्रकरण राजकीय वळण घेत असल्याचे म्हटले आहे. रोहित पवार या फेसबुक पोस्ट करत, सुशांतची केस अनाकलनिय असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

काय म्हणाले आहे रोहित पवार

अभिनेता सुशांत सिंहच्या बाबतीत घडलेली ही घटना सर्वांनाच चक्रावणारी व मनाला चुटपूट लावणारी आहे. या घटनेला आता दीड महिना झालाय. सुरवातीला मुंबई पोलिस आणि चित्रपटसृष्टीपुरतं मर्यादित असलेलं हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेतंय की काय अशी शंका येऊ लागलीय.

सुशांतची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. त्यामुळं या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा. गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचं नावं घेतलं जातं त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळं मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही. या घटनेत चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी आतापर्यंत चौकशीही केलीय.

दरम्यानच्या काळात सुशांत सिंहच्या वडलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि लगोलग बिहार पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले. वास्तविक, बिहार पोलीस इतके कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हतं. तिथल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते इतके दक्ष असतील असं वाटलं नव्हतं. की केवळ याच घटनेपुरती त्यांनी तत्परता दाखवली, हे माहीत नाही.

एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आत्महत्येचं कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे.

बिहारमधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण मुंबईत येतो काय… पाहता पाहता चंदेरी दुनियेत यशाच्या शिखरावर पोचतो काय आणि एक…

Posted by Rohit Rajendra Pawar on Saturday, August 1, 2020

शेवटी रोहितने अपेक्षा व्यक्त करत म्हटले आहे की, सुशांतच्या अकाली जाण्याचा निःपक्षपाती तपास झालाच पाहिजे आणि कोरोनाच्या संकटामुळे कुणावर आत्महत्येची वेळ येणार नाही याचीही दक्षता आपण घ्यायला पाहिजे. याबाबत देशातील सर्व राज्य सरकारे व केंद्र सरकार यांनी भेदभाव, राजकारण, हेवेदावे हे विसरुन एकत्रित काम करायलाच पाहिजे.

हेही वाचा –

कंगनाच्या मनालीतील घरावर गोळीबार; म्हणाली, ‘मला घाबरवण्याचा होतोय प्रयत्न’!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here