Sushant singh rajput case: रियाच्या अटकेनंतर सुशांतच्या बहिणीने दिली पहिली प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रियाला अटक केल्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

श्वेता सिंह किर्ती

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने रिया चक्रवर्तीला अनेक तासांच्या चौकशीनंतर शेवटी आज अटक केली आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यापूर्वीच NCB च्या अटकेत आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात आज अखेर पहिली मोठी अटक झाली आहे.

असे केले सुशांतच्या बहिणीने ट्विट

दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रियाला अटक केल्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  रियाच्या अटकेनंतर सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्तीने एक पोस्ट शेअर करून एक मोठा विजय झाला असल्याचे म्हटले आहे.तिने ट्विट करून तिची पहिली प्रतिक्रिया देताना #GodIsWithUs असे म्हटले आहे. अर्थात ‘देव आमच्या बरोबर आहे’ असे लिहून तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्या भावासाठी न्यायाच्या मार्गावर असलेली श्वेता सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती आणि सुशांतला न्याय मिळावा या क्षणाची वाट पाहत होती. सुशांतच्या कुटूंबासह जगभरातील लोकांनीही सुशांतला न्याय मिळावा म्हणून या लढाईत सहभाग घेतला होता.

दरम्यान, सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिचा भाऊ शोविक नियमितपणे ड्रग्ज खरेदी करायचे असा आरोप होता. सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं शौविकने सांगितले होते. आतापर्यंत रिया चक्रवर्तीने आपण कधीच अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही, असे सांगत होती. पण आज सलग तीन दिवसांच्या चौकशीनंतर रियाने प्रथमच ड्रग्ज घेत असल्याची कबुली दिली.

तसेच ड्रग्स बाबत सुरू असलेल्या तपासासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मंगळवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) चौकशी केली. आज पहिल्यांदा रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आणि तिला अटकही झाली.