घरमुंबईमुख्यमंत्री त्यांच्या मनात आहे ते करतात आणि खुल्या दिलाने हसतात - सुशीलकुमार...

मुख्यमंत्री त्यांच्या मनात आहे ते करतात आणि खुल्या दिलाने हसतात – सुशीलकुमार शिंदे

Subscribe

मुख्यमंत्री त्यांच्या मनात आहे ते करतात आणि खुल्या दिलाने हसतात, अशी कोपरखळी सुशीलकुमार शिंदे यांनी मारली आहे.

‘भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती झोप उडाली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री असून, त्यांच्या जे मनात आहे ते करतात आणि खुल्या दिलाने हसतात’, अशी कोपरखळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावली. हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.

अशोक चव्हाणांनी देखील मारली कोपरखळी

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील कोपरखळी मारली. सध्या राजकीय घडामोडी वेगवेगळ्या घडू लागल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकाच्या दोन ते तीन आवृत्ती काढायला हरकत नाही असे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच कुठलाही संसदीय कार्य मंत्री हा मुख्यमंत्र्यांचा विश्वासू असतो अशी प्रथा आहे पण आता काय प्रथा आहे हे काही माहीत नाही असा अप्रत्यक्ष टोला देखील त्यांनी विनोद तावडे यांना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रवादीच्या ‘आउट गोइंग’चा ‘जाणत्या राजा’लाही धसका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -