घरमुंबईताडदेव येथे सोळा वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

ताडदेव येथे सोळा वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

ताडदेव येथील ट्वीन टॉवरच्या २३ मजल्यावरून एका सोळा वर्षाच्या मुलीने आपले जीवन संपवल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. प्रियांका चौधरी (१६) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. आई-वडील आणि लहान भावासह ती ताडदेव मधील ट्वीन टॉवरच्या २३ मजल्यावर राहत होती. वडिलांचा ज्वेलरीचा व्यवसाय असून आई गृहनी आहे. प्रियांका ही दक्षिण मुंबईतील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकत होती.

शुक्रवारी रात्री सर्वांनी एकत्र जेवण घेऊन आपापल्या खोलीत झोपाण्यासाठी गेले होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तळ मजल्यावर जोराचा आवाज झाल्यामुळे रात्रपाळीचे वॉचमन आवाजाच्या दिशेने धावत आले असता प्रियांका रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली दिसली. वॉचमन यांनी ताबडतोब इमारतीतील रहिवाश्यांना आणि प्रियंकाच्या घरच्यांना बोलावले. प्रियांकाला जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच ताडदेव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यची नोंद केली आहे. प्रियांकाने हे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप काही कळू शकलेले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -