घरमुंबईस्वा. सावरकर मार्गाचे सांस्कृतिक सुशोभीकरण

स्वा. सावरकर मार्गाचे सांस्कृतिक सुशोभीकरण

Subscribe

पदपथांचे सौंदर्यीकरण करणार

मुंबईतील कॅडल रोड अर्थात वीर सावरकर मार्ग हा एकप्रकारे धार्मिक स्थळाचाच एक भाग बनला आहे. माहिम कॉजवेपासून सुरु होणार्‍या या रस्त्यावर प्रारंभीच माहिम चर्च, बाबा मगदुम शहा आणि शेवटाला प्रभादेवीचे श्री सिद्धिविनायक मंदिर आहे. त्यामुळे या रस्त्याला एकप्रकारे सांस्कृतिक ठेवा प्राप्त झाल्याने आता या संपूर्ण रस्त्याच्या पदपथाचे सुशोभीकरण सांस्कृतिक पध्दतीने करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

माहिम कॉजवे येथील पूर्वीचा कॅडल रोड आणि आताचा स्वातंत्र्यवीर मार्गावर माहिम चर्च, मकदुम शाह बाबा दर्गा, वीर सावरकर स्मारक, आसावरी अ‍ॅकॅडमी, संयुक्त महाराष्ट्र कला दालन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळ, शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा, चैत्यभूमी, इंदू मिलच्या जागेत उभे राहणारे बाबासाहेब आंबेडकर स्मारक असून या मार्गावरुन विविध धर्माचे तसेच पंथांच्या लोकांची वर्दळ सुरू असते. विशेष म्हणजे संकष्टी चतुर्थी तसेच दर मंगळवारी श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांवरुन भाविक या रस्त्यांचा तसेच पदपथाचा वापर करत असतात.

- Advertisement -

त्यामुळे यासर्व ठिकाणी भेटी देतानाच भाविक तसेच अनुयायांना रस्त्याच्या पदपथावर चालणे तसेच धार्मिक स्थळांना भेटी देताना प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने बाकडे, टाफटाईल लादी, कचरा पेटी, पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांचे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार या पदपथावर कला प्रतिष्ठापन, दिशा नकाशा, दिशादर्शक फलक लावून सांस्कृतिक पध्दतीने या पदपथांची सुधारणा केली जाणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

शिवसेना नेते, युवासेना अध्यक्ष व आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिकेने या पदपथाची सुधारणा करण्यासाठी निर्णय घेतला आहे. महापालिका जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी माहिम चौपाटीच्या सुशोभीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आता त्यानंतर माहिम कॉजवे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या पदपथाची सुधारणा करण्यात येणार आहे. या पदपथावरून विविध धर्माचे भाविक व अनुदायायी चालत असल्याने त्यांना चालण्यायोग्य पदपथ बनवतानाच, निवांत क्षण म्हणून बसता यावे यासाठी विसाव्याकरता बेंचेस बसवण्यात येणार आहे.

- Advertisement -

सांस्कृतिक पध्दतीने या पदपथांची सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना या पदपथावरून चालताना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. सध्या अनेक भागांमध्ये पदपथ चालण्यायोग्य नसल्याने भाविक रस्त्यावरुन चालतात. परिणामी अपघात होण्याचीही भीती असते. त्यामुळे या रस्त्यावरील धार्मिक स्थळे पाहता यावरील पदपथाची सुधारणा करण्यात येत असल्याचे दिघावकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -