घरमुंबईस्वाध्याय उपक्रम प्रथमच उर्दूमध्ये; महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य

स्वाध्याय उपक्रम प्रथमच उर्दूमध्ये; महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य

Subscribe

उर्दू माध्यमासाठी प्रथमच स्वाध्याय उपक्रम उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. याचा फायदा राज्यातील उर्दू माध्यमातील इयत्ता पहिली ते दहावीतील जवळपास १३ लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय या योजनेच्या उर्दू माध्यमाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते १ जानेवारीला सकाळी ११.०० वाजता करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू यांचे मार्गदर्शन लाभले.

उर्दू माध्यमासाठी प्रथमच स्वाध्याय उपक्रम उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य आहे. याचा फायदा राज्यातील उर्दू माध्यमातील इयत्ता पहिली ते दहावीतील जवळपास १३ लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि लीडरशीप फॉर इक्विटी व कॉन्वेजिनियस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आला. शाळा बंद पण शिक्षण सुरु याचा हा भाग आहे. दर शनिवारी या उपक्रमामध्ये भाषा व गणितातील त्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित १०-१० प्रश्न संच देण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या सोईनुसार प्रश्नसंच पूर्ण करतील व त्यानंतर प्राप्त होणार्‍या उत्तर पत्रिकांवरून त्यांना स्वतःचे मूल्यमापन करण्यास मदत मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. स्वाध्याय उपक्रमाचा कसा लाभ घ्यायचा याबद्दल वर्षा गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी मनोगत व्यक्त करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. राज्यात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आदर्श शाळा योजना राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

स्वाध्यायच्या उर्दू माध्यमाच्या उद्घाटन प्रसंगी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील, संचालक प्राथमिक व माध्यमिक संचालनालयाचे दत्तात्रय जगताप, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवदी यांच्यासह परिषदेचे आयटी व समन्वय विभागाचे उपसंचालक विकास गरड आणि सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी व विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक हे ऑनलाईन उपस्थित होते. सर्व अधिकारी, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांना कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://youtu.be/UNpEvZl७RIw वर करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -