घरमुंबई'स्त्री' संघर्षावर स्वाती साबळेंच्या चित्रांचे प्रदर्शन

‘स्त्री’ संघर्षावर स्वाती साबळेंच्या चित्रांचे प्रदर्शन

Subscribe

स्वाती साबळे यांच्या चित्रांचे विषय महिलांशी संबधित असतात. आजच्या जगातील महिलांचा संघर्ष आणि त्यांचे भावविश्व स्वाती आपल्या चित्रांमधून व्यक्त करतात.

मुंबईच्या चित्रकार स्वाती साबळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन प्रथमच पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ‘मोनालीस कालाग्राम’ या आर्ट गॅलरीमध्ये भरत आहे. स्वाती साबळे यांचे कला शिक्षण एस.एन.डी.टी. विद्यापीठ आणि पुण्याच्या अभिनव कॉलेज येथून झाले आहे. गेली २० वर्ष त्या कला क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या चित्रांची दोन एकल प्रदर्शने मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झाले असून पंचवीस पेक्षा जास्त ‘ग्रुप शो’मध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. हे ‘ग्रुप शो’ मुंबई, दिल्ली, जम्मू, बंगलोर इत्यादी शहरांमध्ये झालेले आहेत. त्यांना आर्ट सोसायटी ऑफ इंडिया त्याचबरोबर प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनचा पुरस्कार मिळालेला आहे.

‘स्त्री’ संघर्षावर रेखाटले आहेत फोटो

स्वाती साबळे यांच्या चित्रांचे विषय महिलांशी संबधित असतात. आजच्या जगातील महिलांचा संघर्ष आणि त्यांचे भावविश्व स्वाती आपल्या चित्रांमधून व्यक्त करतात. त्यांच्या चित्रांमधील आजची ‘स्त्री’ समाजामध्ये घडणाऱ्या घटनांकडे संवेदनशीलपणे पाहत आहे. घर, संसार, नाती, कुटुंब सांभाळून स्वतःचा करिअर करण्याचा प्रयत्न चित्रांमधील ‘स्त्री’ करत आहे. जबाबदारी सांभाळताना स्त्रीची होणारी तारेवरची कसरत, भावनिक घुसमट, इच्छा-आकांक्षा आपल्या चित्रातून व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. स्त्रीवर परंपरेने आणि समाजाने अनेक बंधने (चौकटी) घालून दिलेल्या आहेत आणि काही तिने स्वतःहून लादून घेतलेल्या आहेत. त्या चौकटी तोडून बाहेर येणाच्या प्रयत्न आजची ‘स्त्री’ करताना दिसत आहे. चित्रांमध्ये चौकोनांचा वापर ‘बंधने’ या अर्थाने घेतला आहे. रंगांचे ओघळ, बारीक ठिपके, जाड रंगलेपन त्याचबरोबर चेहरे आणि हाताच्या विशिष्ठ रचनेमधून त्यांनी आजच्या महिलांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे चित्र प्रदर्शन २४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० या कालावधीत सर्वांसाठी बघण्यासाठी खुले असणार आहे.

स्वाती साबळे यांनी रेखाटलेले काही चित्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -