खुशखबर! मुंबईत स्वाईन फ्लूच्या रुग्णांत ९७ टक्क्यांनी घट

मुंबईकरांसाठी ही खूषखबर आहे की, यंदा एच१एन१ चा प्रभाव राज्याच्या तुलनेत जवळपास नसल्यासारखाच आहे. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी स्वाईन फ्लूच्या केसेसमध्ये जवळपास ९७ टक्क्यांनी घट झाली आहे.

Mumbai
Swine flu

महाराष्ट्रात यावर्षी स्वाईन फ्लूचे आतापर्यंत अडीच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. पण, मुंबईत स्वाईन फ्लूचं प्रमाण कमी झाल्याचं यावर्षी आढळून आलं आहे. मुंबईकरांसाठी ही खूषखबर आहे की, यंदा एच१एन१ चा प्रभाव राज्याच्या तुलनेत जवळपास नसल्यासारखाच आहे. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी स्वाईन फ्लूच्या केसेसमध्ये जवळपास ९७ टक्क्यांनी घट झाली आहे. स्वाईन फ्लू एच१ एन१ या व्हायरसच्या संपर्कात आल्यावर होतो. राज्याचे संसर्गजन्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे २ हजार ५५२ रुग्ण ग्रस्त आहेत. त्यासोबतच ४२२ रुग्णांची स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.

म्हणून स्वाईन फ्लूचे रुग्न कमी

गेल्या वर्षी ६ हजार ३८४ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले होते. ज्यात ७८८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१७ या साली स्वाईन फ्लूचे ९९५ केसेस समोर आले होते. पण, या वर्षी फक्त २५ केसेस समोर आले आहेत. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणात होणारा बदल स्वाईन फ्लूच्या विषाणूंसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. हे वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल असतं. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या वर्षी वातावरणात झालेल्या चढ-उतारामुळे स्वाईन फ्लूचे रुग्ण अधिक होते. शहरातील दिवस आणि रात्रीच्या तापमानात जास्त अंतर नव्हतं. त्यामुळे शहरात स्वाईन फ्लूचे रुग्ण कमी आढळले.


हेही वाचा – सावधान! पुन्हा आढळले स्वाईन फ्ल्यूचे १७ रुग्ण

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here