Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर महामुंबई नालासोपाऱ्यात गुंडांचा हैदोस; मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर तलवार हल्ला

नालासोपाऱ्यात गुंडांचा हैदोस; मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर तलवार हल्ला

Nalasopara

नालासोपाऱ्यातील प्रगती नगरमध्ये गुंडांनी एका तरुणावर तलवार आणि बाबूंनी हल्ला केल्याची घटना २९ जूनला घडली असून तुळींज पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. तर तीन जण फरार झाला आहे. प्रगती नगरमध्ये राहणाऱ्या संजय मिश्रा (वय २२) याचा मित्र सलमानला काही जण मारहाण करत होते. ते भांडण सोडवण्यासाठी गेला होता. त्यावेळी हातात तलवार आणि बांबू असलेल्या गुंडांनी संजयवर हल्ला केला. तब्बल १० मिनिटे गुंडांचा हैदोस सुरू होता. गुंडांनी संजयवर तलवार आणि बाबूंनी हल्ला केला. त्यात तो जखमी झाला.

या प्रकरणी ३० जून रोजी पप्पू, सलीम, नूर, आणि विजय थॉमस या गुंडाविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली आहे. तर इतर तीन जणांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. डी. पाटील यांनी दिली आहे. हातात तलवार, लाठी-काठी घेऊन गुंडांचा हैदोस सुरु असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे घबराट पसरली आहे.

हेही वाचा –

खासगीकरणाच्या दिशेने भारतीय रेल्वे! देशात १०९ मार्गांवर धावणार १५१ खाजगी ट्रेन