घरमुंबईअंधार्‍या मार्गात मिळवली सोनेरी किरणे

अंधार्‍या मार्गात मिळवली सोनेरी किरणे

Subscribe

हेलन केलर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिंनीचे यश

अंध-बहिर्‍या असलेल्या दोन विद्यार्थिनींना बोर्डाने प्रथमच परीक्षेसाठी टॅक्टिलक साईन लँग्वेज (हातावरील स्पर्शाने ओळखणे) येत असलेल्या सहाय्यकाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. टॅक्टिकल साईनच्या माध्यमातून पेपर देणार्‍या हेलन केलर इन्स्टिट्यूटमधील दोन्ही विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. अंध-बहिर्‍या असलेल्या काजल मांढेर हिला 84 टक्के तर ऋतिक मेहताला 80 टक्के गुण मिळाले आहेत. काजल व ऋतिकाप्रमाणेच हेलन केलर इन्स्टिट्यूटमधील अन्य 12 मुलीही परीक्षेत उतीर्ण झाल्याने इन्स्टिट्यूटचा निकाल 100 टक्के लागला आहे.

हेलन केलर इन्स्टिट्यूटमधून शिक्षण घेणार्‍या काजल मांढेर ही अ‍ॅशेर सिंड्रोमने ग्रस्त असल्याने तिची दृष्टी फारच अधू आहे. तर कृतिका हिला जन्मत:च अनेक विकार जडलेले होते. त्यामुळे तिच्या डोळ्यांवर परिणाम झाला असून, तिची दृष्टी फारच अधू आहे. या दोन्ही मुलींना तीनपट जाड्या भिंगातून पाहिल्यासच दिसते. त्यामुळे या विद्यार्थिनींना मॅग्निफाईड पेपर उपलब्ध करून देण्याची मागणी हेलन केलर इन्स्टिट्यूटकडून करण्यात आली होती. मात्र मॅग्निफाईड पेपर उपलब्ध करणे शक्य नसल्याने बोर्डाने त्यांना टॅक्टिकल साईन लँग्वेजचा वापर करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे काजल व कृतिकाने टॅक्टिकल साईन लँग्वेज येत असलेल्या मध्यस्थीच्या साहय्याने पेपर दिला होता. मात्र सहाय्यकाने या दोन्ही विद्यार्थिनींना पेपरमधील प्रश्न फक्त टॅक्टिकल साईन लँग्वेजच्या माध्यमातून सांगितला आहे. परंतु दोन्ही विद्यार्थिनींनी हे पेपर कोणत्याही सहाय्यकाशिवाय लिहिले आहेत.

- Advertisement -

कोणत्याही सहाय्यकाशिवाय पेपर लिहिणार्‍या या काजल व कृतिका या दोन्ही मुलींना दहावीच्या परीक्षेच घवघवीत यश मिळवले आहे. काजलने परीक्षेत 84 टक्के व कृतिका हिने 80 टक्के मिळवले आहेत. काजलची घरची परिस्थिती फारच हालाखीची असून, ते तिचे शिक्षण पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे हेलन केलर इन्स्टिट्यूटने तिच्या शिक्षणासह वैद्यकीय खर्च उचलला आहे. हेलन केलर इन्स्टिट्यूटकडून सर्व 14 मुलींच्या शिक्षणाचा खर्च करण्यात येत आहे. 14 ही मुली उतीर्ण होण्यासाठी इन्स्टिट्यूटमधील शिक्षकांचे मोलाची भूमिका आहे, अशी माहिती हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर डिफ अ‍ॅण्ड डिफब्लाईंड संस्थेच्या संचालिका अनुराधा बागची यांनी सांगितले.

काजल व कृतिकाप्रमाणे संस्थेतील हर्षद शिंदे (78.40 टक्के), खुशबू गुप्ता (78.40टक्के), रोहित भोसल (77 टक्के), सविता कुर्‍हाडे (77टक्के),अक्षय टोपे (75टक्के), सुनिल परब (74टक्के) आदी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश केले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -