घरमुंबईएक नजर आजच्या दिवसभरातील राजकीय घडामोडींवर

एक नजर आजच्या दिवसभरातील राजकीय घडामोडींवर

Subscribe

आजचा रविवारचा दिवस राज्याच्या राजकीय घडामोडींसाठी विशेष ठरला. सकाळपासून सायंकाळपर्यंत घडलेल्या दिवसभरातील राजकीय घडामोडींवर आपण लक्ष टाकूया.

राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता दिवसेंदिवस वाढत आहे. भाजप आणि शिवसेना या महायुतीतील दोन प्रमुख पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपद आणि इतर महत्वाच्या खाते वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. तर दुसरीकडे आम्ही विरोधातच बसणार अशी ठाम भूमिका मांडणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांमध्ये बैठकींवर बैठकी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सुद्धा तळ्यात-मळ्यात सुरु आहे. आजचा रविवारचा दिवस राज्याच्या राजकीय घडामोडींसाठी विशेष ठरला. सकाळपासून सायंकाळपर्यंत घडलेल्या दिवसभरातील राजकीय घडामोडींवर आपण लक्ष टाकूया.

अशा घडल्या घडामोडी

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी दोन वाजता हॉटेल रिट्रिटवर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली.
  • मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत व्यक्त केला.
  • वर्षा निवासस्थानी सकाळी ११ वाजता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु झाली. त्यानंतर पुन्हा दुपारी ४ वाजता कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. त्यात राज्यात सत्तास्थापनेचा दावा करायचा नाही, असे अमित शहा यांनी आदेश दिले.
  • त्यानंतर मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सत्तास्थापनेचा दावा करणार नाही असे भाजपच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
  • राज्यपालांच्या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्याचे सांगितले.
  • त्यानंतर मातोश्रीवर मोठ्या घडामोडी घडल्या. शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती होती.
  • सरकार स्थापन करणार नाही, असा प्रफुल्ल पटेल यांनी दावा केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -