घरCORONA UPDATEदवाखाने बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करा, स्थायी समिती अध्यक्षांचे पालिकेला फर्मान

दवाखाने बंद ठेवणाऱ्यांवर कारवाई करा, स्थायी समिती अध्यक्षांचे पालिकेला फर्मान

Subscribe

‘करोना’मुळे सर्व लॉकडाऊन असल्याने याची खबरदारी म्हणून सर्व नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन करत घरी बसले आहेत. परंतु या करोनाला घाबरुन अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत.

‘करोना’मुळे सर्व लॉकडाऊन असल्याने याची खबरदारी म्हणून सर्व नागरिक सरकारच्या आदेशाचे पालन करत घरी बसले आहेत. परंतु या करोनाला घाबरुन अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना अन्य प्रकारच्या आजारांवर वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे ही गंभीर परिस्थिती पाहता जे डॉक्टर दवाखाने उघडत नाहीत आणि रुग्णसेवा देत नाहीत, अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा – मुंबईत करोनामुळे एका संशयित डॉक्टरचा मृत्यू

- Advertisement -

स्थायी समितीच्या बैठकीत निरिक्षण नोंदवले

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करोनासंदर्भात चर्चा करताना विविध सदस्यांनी सुचना करतानाच अध्यक्षांनी आपले निरिक्षण नोंदवले. यावेळी त्यांनी करोना विषाणूचा धोका वाढत असताना अनेक जण अन्य आजारांमुळे ग्रस्त आहेत. करोनामुळे पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांसह छोट्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारीका करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, मलेरिया अशा विविध आजारांच्या रुग्णांना उपचार मिळण्यास येणारी अडचण लक्षात घेता, यापुढे पालिका हद्दीतील खासजी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश संबंधित डॉक्टरांना प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. जर पालिकेच्या आदेशाकडे अशाप्रकारे डॉक्टर्स कानाडोळा करत असतील, तर अशा डॉक्टरांवर त्वरित कारवाई करा, असे निर्देश जाधव यांनी प्रशासनाला दिले.

हेही वाचा – धक्कादायक! २ महिन्यांत १५ लाख आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात आले

- Advertisement -

यामुळे करोना संशयितांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल

कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांसह अन्य कर्मचाऱ्यांचे काम प्रशंसा करण्याजोगे आहे. फक्त करोनाच्या संशयित रुग्णांच्या चाचणीचा अहवाल कमीतकमी वेळेत उपलब्ध करून दिल्यास रुग्णांवर अधिक लवकर उपचार करणे शक्य होईल. सध्या करोना संशयितांची चाचणीचा अहवाल येण्यास तीन ते चार दिवस लागत असून रुग्ण यामुळेच अधिक खचून जात असल्याचे मत स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांनी मांडले. यावर उत्तर देताना महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी, करोना संशयितांच्या चाचणीसाठी जी किट होती, ती तेवढी प्रभावी नव्हती. परंतु आता नवीन किट उपलब्ध केल्या असून करोना संशयितांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -