घरमुंबईभूकंपाच्या भीतीने थंडीतही झोपतात घराबाहेर

भूकंपाच्या भीतीने थंडीतही झोपतात घराबाहेर

Subscribe

१ डिसेंबरला पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे या तालुक्यामध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थ रात्रभर घराबाहेर झोपतात. एकतर राज्यभरामध्ये थंडी पडायला हळूहळू सुरुवात झाली आहे. अशा थंडीमध्ये देखील हे नागरिक भूंकपाचा धक्क्याच्या भीतीने घराबाहेर झोपत आहेत.

तलासरी आणि डहाणूमध्ये राहणारे ग्रामस्थ सध्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून तलासरी आणि डहाणू तालुक्यात भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्याकाही दिवसांपूर्वी या दोन्ही तालुक्यांना भूकंपाचे धक्के बसले होते. त्यामुळे त्यांच्या घराला तडे गेले होते. रात्री अपरात्री केव्हाही भूकंप येऊ शकतो त्यामुळे याठिकाणचे ग्रामस्थ रात्रभर झोपत नाहीत. १ डिसेंबरला पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे या तालुक्यामध्ये येणाऱ्या गावातील ग्रामस्थ रात्रभर घराबाहेर झोपतात. एकतर राज्यभरामध्ये थंडी पडायला हळूहळू सुरुवात झाली आहे. अशा थंडीमध्ये देखील हे नागरिक भूंकपाचा धक्क्याच्या भीतीने घराबाहेर झोपत आहेत.

संपूर्ण रात्र घराबाहेर

डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबरला भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला भूकंपाचा मध्यरात्री पहिला धक्का १ वाजून ३५ मिनिटांनी, तर दुसरा भूकंप १ वाजून ४५ मिनिटांनी आणि तिसरा धक्का २. ०५ मिनिटांनी बसला आहे. हे भूकंपाचे धक्के सौम्य जरी असले तरी मात्र संपूर्ण भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. १ डिसेंबरला पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्यामुळे तेव्हापासून भीतीपोटी हे नागरिक घराबाहेर झोपतात. भीतीमुळे बऱ्याच वेळा लोक झोपत देखीत नाहीत. भूकंपाच्या धक्क्यामुळे घरांचे नुकसान होऊन जिवीतहानी होऊ नये यासाठी हे नागरिक कडाक्याच्या थंडीत घराबाहेर संपूर्ण रात्र काढतात.

- Advertisement -

असे जाणवले भूकंपाचे धक्के

या आधी देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२५ वाजता ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर नोव्हेंबर रोजी सायंकाळी ३.१५ वाजता ३.३ रिश्टरचे मोठे धक्के बसले होते. तसेच २४ ऑक्टोबर रोजी पहिला मोठा धक्का बसला होता. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र अनेकांच्या घराला तडे जाऊन घरांचे, शासकीय इमारतीचे नुकासान झाले होते. या भागात सातत्याने होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. भूकंपाच्या धक्क्याची भीती मनात ठेवत अनेकांनी स्थलांतर केले आहे.

हेही वाचा – 

- Advertisement -

डहाणू परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरले

पालघरमध्ये ऐकू आले गूढ आवाज; जाणवले भूकंपाचेही हादरे

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -