घरताज्या घडामोडीTandav Controversy : आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

Tandav Controversy : आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

अभिनेता सैफ अली खानच्या ‘तांडव’ वेबसीरिजवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून आंदोलन करणारे भाजपचे आमदार राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तांडव वेबसीरीजमध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आल्याचा दावा राम कदम यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी घाटकोपरच्या चिराग नगर पोलीस स्थानकात तक्रार देखील केली होती. तसेच, तांडवच्या निर्मात्यांवर, दिग्दर्शकांवर, लेखकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, मागणी अद्याप मान्य होत नसल्यामुळे त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

तांडव वेब सीरीजच्या पहिल्याच भागामध्ये हिंदू देवतांचा अपमान केल्याचा दावा राम कदम यांनी केला असून त्यासाठी त्यांनी दोनच दिवसांपूर्वी अॅमेझॉनच्या कार्यालयात देखील ठिय्या दिला होता. ही अॅमेझॉनची वेबसीरिज असल्यामुळे त्यांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, तिथे मागणी मान्य होत नसल्यामुळे अखेर त्यांनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या दबावापुढे कारवाई करत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणी लखनौ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते मुंबई तपासासाठी येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -