घरCORONA UPDATEटाटा समुहाचा कोरोना रुग्णांसाठी नवा उपक्रम; 'या' दोन वैद्यकीय संस्थांसोबत केली हातमिळवणी

टाटा समुहाचा कोरोना रुग्णांसाठी नवा उपक्रम; ‘या’ दोन वैद्यकीय संस्थांसोबत केली हातमिळवणी

Subscribe

आतापर्यंत वेळोवेळी गरजूंच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला आर्थिक मदत देणारे टाटा समूह आता कोविड – १९ च्या संदर्भात आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना सहाय्य करण्यासाठी सरसावली आहे. टाटा ट्रस्ट्स आणि टाटा ग्रुपने कोविड-१९ रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या देखभालीची अधिक जास्त कौशल्ये आत्मसात करता यावी, याकरता आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांना सहाय्य करण्यासाठी दोन नामांकित वैद्यकीय संस्थांसोबत हातमिळवणी केली आहे. यामध्ये वेल्लोरचे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) आणि हैद्राबादचे केयर इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (सीआयएचएस) या संस्थांचा समावेश आहे. या दोन संस्थांच्या सहयोगाने टाटा ट्रस्ट्सचा हा उपक्रम चालवला जाणार असल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली आहे.

काय म्हणाले रतन टाटा

यासंबंधी टाटा ट्रस्ट्सचे संस्थापक रतन टाटा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड – १९ विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे. खास तयार करण्यात आलेले २२ तासांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम हे निवडक रुग्णालयांनी निश्चित केलेल्या विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी असून ते मोफत दिले जात आहेत. दरम्यान, गंभीर स्थितीतील रुग्णांवरील उपचारांच्या व्यवस्थापनातील तज्ज्ञ असलेल्या आयसीयू फिजिशियन्स आणि इंटेन्सिव्हिस्टसना कोविड-१९ रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या संख्येने डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मदत भासणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी नॉन-आयसीयू व्यावसायिकांना गंभीर स्थितीतील रुग्णांवरील उपचार तसेच त्यांच्या देखभालीची मूलभूत तत्त्वे व प्रक्रिया यांची माहिती मिळवून देणे, हा या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उद्देश आहे.’

- Advertisement -

असे असेल प्रशिक्षणाचे स्वरूप

आयसीयूमध्ये दिले जाणारे उपचार आणि प्रक्रियांमधील अत्यावश्यक बाबी, एअरवे मॅनेजमेंट, व्हेंटिलेशन मॅनेजमेंट यासारख्या क्रिटिकल केअर कौशल्यांची माहिती तसेच सौम्य, मध्यम किंवा गंभीर म्हणून एखाद्या स्थितीचे परीक्षण कसे करावे. त्या केसेसना योग्य सुविधांकडे कसे सोपवावे यांचा समावेश या प्रशिक्षणात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या प्रोग्राम्समध्ये कोविड – १९ संबंधीची परिस्थिती हाताळली जाण्यासाठी आयसोलेशन सेंटर्स, क्वारंटाईन सेंटर्स यासारख्या विविध आवश्यक सुविधांच्या व्यवस्थापनाविषयी तसेच सौम्य प्रमाणात आजारी रुग्णांवरील उपचार व सर्व्हिस एरियांच्या व्यवस्थापनाची देखील माहिती दिली जाणार आहे. लाईव्ह वेबिनार्स किंवा त्या आधी तयार करण्यात आलेल्या मॉड्युल्समार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीचे हे प्रशिक्षण लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईल फोन्सवर पाहता येणार आहे.

यासाठी केली या दोन संस्थांची निवड 

सीएमसी वेल्लोरकडून मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण दिले जाते. हे मास्टर ट्रेनर्स आपापल्या विभागांमध्ये अधिक जास्त लोकांना प्रशिक्षण देऊ शकतात. सीआयएचएस हैद्राबादने विकसित केलेल्या पद्धतीमध्ये थेट छोट्या समूहांना प्रशिक्षित केले जाते. या दोन्ही संस्थांनी आपापले प्रशिक्षण कार्यक्रम अशा पद्धतीने तयार केले आहेत की त्यामुळे प्रशिक्षणार्थींना त्यांच्या इंटेन्सिव्हिस्ट व आयसीयू सहकर्मचाऱ्यांना गरज भासेल तेव्हा आणि त्याप्रमाणे मदत करता येऊ शकेल.

- Advertisement -

हेही वाचा –

राणे सत्ता नसल्याने अस्वस्थ; बाळासाहेब थोरात यांचा राणेंना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -