घरताज्या घडामोडीतृप्ती देसाईंचे आता थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान

तृप्ती देसाईंचे आता थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान

Subscribe

किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात दोन-तीन दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सम तिथीला मुलगा आणि विषम तिथीला मुलगी असा पुत्रप्राप्तीचा फॉर्म्युला सांगितल्या नंतर इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तसेच महिला आणि संततीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात दोन-तीन दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या तृप्ती देसाई?

‘कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी अहमदमनगर जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेतली असून, त्यांच्याकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. इंदुरीकर हे आपल्या अनेक कीर्तनांमधून महिलांचा अपमान करतात. त्यामुळे असा अपमान सहन केला जाणार नसल्याचा’ इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

अद्याप गुन्हा दाखल नाही

संतती संदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन वादात सापडलेल्या निवृत्ती महाजाराजांना अखेर उपरती झाली. इंदुरीकरांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभरात वादंग उठले असताना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे आली. तर दुसरीकडे नगरच्या जिल्हा शल्यचिकीत्सकांनी महाराजांना नोटीस बजावत खुलासा मागविला असताना मंगळवारी त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, असे असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल गेला पाहिजे. तशी मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच त्यांनी आम्हाला सकारात्मक आश्वासन दिले आहे. मात्र, तरीही त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.


हेही वाचा – अजितदादा, ती वर्ष आपण वाया घालवली… – उद्धव ठाकरे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -