शिक्षक शिक्षकेतरांचे वेतन होणार दिवाळीपूर्वी!

भाजपा शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्यामुळे वित्त विभागाने घेतला निर्णय

Mumbai
school-education-teacher_1440-768x530
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यातील सरकारी कर्मचार्यांसोबतच शिक्षक-शिक्षकेतरांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचा निर्णय वित्त विभागाने निर्गमित केला असून भाजपा शिक्षक आघाडीच्या पाठपुराव्यामुळे वित्त विभागाने निर्णय घेतला आहे. याबाबत भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी १६ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षणमंत्री, वित्तमंत्री तसेच शालेय शिक्षण विभागाच्या सचिव व उपसचिवांना निवेदन दिले होते. यावेळी भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई सहसंयोजक बयाजी घेरडे, सुभाष अंभोरे, विजय धनावडे आदी उपस्थित होते.

वेतन दिवीळीपुर्वी व्हावे, भाजपा शिक्षक आघाडीची मागणी

दिवाळी २५ तारखेपासून सुरू होत आहे. तसेच २१ तारखेला निवडणूक असल्याने शिक्षक-शिक्षकेतरांच्या सेवा निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात अधिग्रहित केल्या आहेत. निवडणुकीचे काम संपल्यावर शिक्षक-शिक्षकेतर मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी दिवाळी साजरी करायला जाणार असल्याने दिवाळीपूर्वीच वेतन व्हावे, अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने केली होती.

तसेच वित्त आणि शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना भेटून पाठपुरावा करण्यात आला होता. त्यामुळे शासन निर्णय निर्गमित झाला आहे. वित्त विभागाने लेखा व कोषागारे संचालनालयाच्या संचालकांनी याबाबत संबंधितांना आवश्यक त्या सूचना देऊन दिवाळीपूर्वी वेतन देण्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.


हेही वाचा – स्टेट बँकेतर्फे उद्यापासून सगळी कर्ज स्वस्त होणार