घरमुंबईआरोग्य क्षेत्रात तांत्रिकीकरण होणे आवश्यक - आरोग्यमंत्री

आरोग्य क्षेत्रात तांत्रिकीकरण होणे आवश्यक – आरोग्यमंत्री

Subscribe

तंत्रज्ञानाचा वापर करून माता व बालमृत्यूदर कमी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे सांगितले.

राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागात उत्तम आरोग्य सोयी सुविधा पुरविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटीलीजन्स) वापर करून सामान्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करतांनाच या तंत्रज्ञानाचा वापर करून माता व बालमृत्यूदर कमी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी येथे सांगितले. सहार येथील जे. डब्लू. मॅरिएट हॉटेलमध्ये ‘हेल्थकेअर आर्टिफिशियल इंटेलिजेंस कॅटेलिस्ट’ (एचएआयसी) या प्रकल्पासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र आणि ब्रिटन मधील संबंध दृढ होण्याची शक्यता

ब्रिटनसोबत या उपक्रमासाठी सहकार्य करण्यास आरोग्य विभाग उत्सूक असून यामुळे महाराष्ट्र आणि ब्रिटन मधील संबंध दृढ होतील. ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेकडून प्रेरणा घेऊन बाईक अम्ब्युलन्सचा प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात आला आहे. आता या क्षेत्रात तंत्रज्ञानाचे पुढचे पाऊल म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात पाच कंपन्या सूचीबद्ध

शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या माध्यमातून देशातील गंभीर आजारांवर उपाययोजना करण्यासाठी ब्रिटन मधील आरोग्य क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटीलीजन्स कंपन्या काम करणार आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पाच कंपन्या सूचीबद्ध करण्यात आल्या असून फ्युचर टेक फेस्टिवलमध्ये त्यांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी ब्रिटन येथील भारतीय आरोग्य सेवा विशेषतज्ञ क्रिस बॉर्न, ब्रिटनच्या जागतीक व्यापार विभागातील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. माईक शॉर्ट, यांच्यासह देशभरातील रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -