नालासोपाऱ्यामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

याप्रकरणातील पीडित तरुणी मानसिक आजाराने ग्रस्त असून, मुख्य संशयित ओरापी हा परदेशात पळून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Mumbai
Teenage Girl Gang Raped in Nalasopara mumbai
प्रातिनिधीक फोटो

दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत असताना आता आणखीन एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. नालासोपारा
इथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे.  या प्रकरणातील पीडित तरुणी मानसिक रुग्ण असल्यामुळे बलात्कार नेमका कुणी व कुठे (ठिकाण/जागा) केला हे पोलिसांना सांगणं तिला शक्य होत नाहीये. दरम्यान, बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी मुख्य संशयित ओरापी हा परदेशात पळून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत असून, बलात्कार करुन फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. 

सविस्तर घटनाक्रम…

नालासोपारा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या तरुणीचे १० ऑक्टोबर रोजी बहिणीशी भांडण झाले. पीडित तरुणीला मानसिक आजाराने ग्रासले असून भांडणानंतर ती घरातून निघून गेली. मात्र, दुसऱ्या दिवशी जेव्हा ती परतली तेव्हा घरात आल्यानंतर तिने पोटदुखीची तक्रार केली. पोटदुखी वाढल्यामुळे वडील आणि बहिणीने तिला स्थानिक रुग्णालयात नेले. त्यांनतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर लगेचच पीडित मुलीच्या वडिलांनी तुळींज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. सुरुवातीला पीडित तरुणी वांद्रे येथे गेली असावी, असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले कारण पीडित तरुणीचे कुटुंबीय याआधी वांद्रे येथे वास्तव्यास होते. 


वाचा: मुंबईत फटाक्यांमुळे ३ जण जखमी

पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या या माहितीमुळे हा गुन्हा सर्वप्रथम वांद्रेच्या निर्मल नगर पोलीस स्थानकात नोंदवण्यात आला. मात्र,  निर्मलनगर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता पीडितेने समुद्र, जुहू असा उल्लेख केला. त्यामुळे पोलीस तिला घेऊन जुहूपासून वरळीपर्यंत जाऊन आले. मात्र, काहीच ठोस माहिती हाती लागली नाही. तरीही पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा ताडदेवचा रहिवासी असून तो परदेशी पळाल्याचा अंदाज पोलिसांना आहे. त्यामुळे सध्या ही केस ताडदेव पोलिसांकडे सोपवण्यात आली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here