घरमुंबईराज्यात थंडी वाढणार, पण हिवाळ्याला सुरूवात डिसेंबरमध्येच

राज्यात थंडी वाढणार, पण हिवाळ्याला सुरूवात डिसेंबरमध्येच

Subscribe

मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली खाली घसरण्याचे संकेत प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईमार्फत देण्यात आले आहे. येत्या ८ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानाचा पारा कमी घसरेल. तर काही ठिकाणी एक आकड्यापर्यंत तापमानाचा पारा खाली घसरेल असे हवामान विङागाकडून स्पष्ट केले आहे. मुख्यत्वेकरून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात थंडीचा पारा खाली घसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यंदा थंडीचा मौसम हा फेब्रुवारीपर्यंत अनुभवता येणार आहे हे हवामान विभागाने याआधीच स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

मुंबईत यंदा पहिल्यांदाच तापमानाचा पारा २० डिग्री सेल्सिअसच्या खाली घसरल्याचा अनुभव मुंबईकरांनी शनिवारी (७ नोव्हेंबरला) घेतला. सांताक्रुझ वेधशाळेत तापमानाची नोंद यंदाच्या थंडीच्या मौसमात पहिल्यांदाच १९.७ डिग्री सेल्सिअस इतकी झाली. तर कुलाब्यात किमान तापमान हे २४ डिग्री इतके होते. येत्या काही आठवड्यामध्ये तापमानात आणखी घट होण्याचे संकेत हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आले आहेत. त्यामध्ये अॅण्टीसायक्लोन विंड पॅटर्न हे एक कारण असेल. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार थंडीचे आगम डिसेंबरशिवाय होणार नाही असेच संकेत आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये वातावरण हे २० डिग्री सेल्सिअसच्या खाली असेल, यासाठी वाऱ्याचा वेग हे मुख्य कारण असेल. पण थंडीचे आगमन हे डिसेंबरमध्येच अधिकृतपणे होईल असे हवामान विभागाचे संकेत आहेत. मुंबईत हवेतला गारवा वाढतानाच हवेची गुणवत्ताही सुधारल्याचे चित्र समोर आले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत नोव्हेंबरमध्ये वाढ झाली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -