घरमुंबईयोग्य उपचार न मिळाल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

योग्य उपचार न मिळाल्याने दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Subscribe

ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप, चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन

वाडा तालुक्यातील मोहोट्याचा पाडा येथील मैत्री पाटील या दहा वर्षीय मुलीवर आरोग्य विभागाकडून योग्य उपचार न मिळाल्याने शनिवारी पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला असून आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गावात तीव्र आंदोलन छेडत आरोग्य विभागाचा निषेध नोंदवत घटनेची चौकशी करून दोषीं आरोग्य अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली.

तालुक्यातील मोहोट्याचा पाडा येथे शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील एक डॉक्टर कुलदैवतांचे दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यानंतर ते डॉक्टर करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोग्य विभागाने मोहोट्याचा पाडा येथील सात नागरिकांना पोशेरी येथे कॉरंटाईन केले होते.या सात जणात मैत्री पाटील ही मुलगीही होती.त्यांना २ जून रोजी कॉरंटाईन करण्यात आले होते. मैत्री हिला ताप व उलट्या होत असल्याने पोशेरी येथून तिला वसई येथील गोल्डन पार्क या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र येथेही तिला फरक न पडल्याने तिला भाईंदर येथील नेपच्यून रूग्णालयात दाखल केले होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने तिला ठाणे येथील ज्युपिटर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र येथे तिची प्रकृती आणखी खालावून पहाटेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

ज्युपिटर रूग्णालयात तिची कोरोना तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तिचा मलेरिया डेंग्यू या तापाने मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. मैत्री हिच्यावर योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी गावात तीव्र आंदोलन छेडीत आरोग्य विभागाचा निषेध नोंदवला. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मैत्रीच्या नातेवाईकांनी केला असून या घटनेची चौकशी करून दोषीं आरोग्य अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -