घरमुंबईनालासोपारा स्फोटक प्रकरण; आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी

नालासोपारा स्फोटक प्रकरण; आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी

Subscribe

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी आज महाराष्ट्र एटीएसने वैभव राऊत, श्रीकांत पांगरकरसह 4 आरोपीना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चारही आरोपींना पुन्हा ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणातील वैभव राऊत, श्रीकांत पांगारकर, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या ४ आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींचा पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट होता. स्फोट घडवण्यासाठी श्रीकांत पांगारकर आर्थिक मदत करणार होता. नालासोपारा स्फोटक प्रकरणी सुनावणी दरम्यान एटीएसने ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवण्याचा कट

वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर आणि श्रीकांत पांगारकर या चार आरोपींनी आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणी दरम्यान आरोपींचा पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये स्फोट घडवून आणण्याचा कट होता अशी माहिती एटीएसने दिली. दरम्यान सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. सुनावणी दरम्यान सीबीआयने शरद कळसकरची कस्टडी मागितली आहे.

चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासे

आजच्या सुनावणीत पोलीस कोठडीसाठी सरकारी वकिलांनी एटीएसच्या तपासाबाबत माहिती देताना म्हटले आहे की, आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत काही महत्वाचे धागेदोरे मिळाले असून नालासोपारा या ठिकाणाहून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत याच्या एटीएस चौकशीत त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. वैभव राऊत यांच्या घरातून पोलिसांनी हस्तगत केलेले गावठी बॉम्ब हे पुण्यातील सनबर्न ह्या कार्यक्रमात फोडून घातपात घडवायचा कट होता.

- Advertisement -

आरोपी कोडवर्डमध्ये संवाद करायचे

वैभव राऊत हा इतर अटक आरोपी आणि काही महत्वाच्या व्यक्तींशी गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात होता . या दरम्यान वैभव राऊत, श्रीकांत पांगरकर यांच्या दरम्यान सुरू असलेल्या कोडवर्ड मधील संवाद काय होता याचा तपास पूर्ण करायचा असून पोलीस चौकशीत आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळणार असल्याचे आज न्यायालयाला सांगण्यात आले. शरद काळसकर याच्याकडून काही नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यात कोडवर्ड आहेत ज्यांना अजूनही डिकोड करायचे काम बाकी आहे. आरोपी शरद याने काही ठिकाणी जाऊन घातपात कारवायांसाठी रेकी केली होती, असे आज न्यायालयात एटीएसने सांगितले. आतापर्यंत अटक आरोपींकडून डेटा आणि सीडी जप्त केली असल्याने यासंदर्भात चौकशी करण्यासाठी सरकारी वकिलांनी एटीएस कोठडीची मागणी केली.

शस्त्रसाठा दुसऱ्या राज्यातून आणला होता

या प्रकरणातील अटक आरोपीकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे राज्याच्या बाहेरुन आणली आहेत. ज्यामुळे याकामी तपासासाठी आम्हाला दुसऱ्या राज्यात जायचे आहे असे एटीएसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अटक आरोपींना ही शस्त्रे कोणी पुरवली, यांचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा तपासा करायचा असल्याचे न्यायालयाला आज सांगण्यात आले आहे. यानंतर न्यायालयाने सर्व आरोपीना 3 सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -