घरमुंबईभांडलो तर भाजप सरकार येईल, ही महाविकास आघाडातील अवस्था - चंद्रकांत पाटील

भांडलो तर भाजप सरकार येईल, ही महाविकास आघाडातील अवस्था – चंद्रकांत पाटील

Subscribe

संपुर्ण वर्षभरात ठाकरे सरकार अपयशी

महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत संपुर्ण वर्षभरात खुर्चीसाठीची चाललेली धडपड पहायला मिळाली तसेच अपमान सहन करावे लागले. अनेकदा सकाळी भांडायचे, भांडलो तर भाजप सरकार म्हणून येईल अशी भीती आहे. सरकार चालवण्याचा फक्त प्रयत्न केला गेला, मात्र यामध्येसामान्य माणुस भरडला गेला अशी टीका भाजप महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  कोरोना परिस्थिती हाताळणे, शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षणाचा खेळखंडोबा, मराठा आरक्षण अशा अनेक विषयात अपयश आलेले हे गोंधळलेले सरकार असल्याची टीका त्यांनी केली. अकृत्रिमपणे निर्माण झालेले सरकार असल्याचा टोमणाही त्यांनी मारला.

कोरोना एक तृतीयांश मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. देशभराच्या तुलनेत ३४ टक्के मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. कोरोना काळात स्थलांतरीत मजुरांचे हाल झाले. त्यामुळे येत्या काळात हिवाळी अधिवेशन घेण्याची हिंमत दाखवावी असेही आव्हाने चंद्रकांत पाटील यांनी दिले. संपुर्ण वर्षभरातले भ्रष्टाचाराचे वाभाडे काढू. त्यामुळे अधिवेशन काढण्यासाठी सरकार इच्छुक नाही आणि या सरकारची अधिवेशनाला सामोरे जाण्याची हिंमत नाही असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

रोखठोकच्या निमित्ताने संजय राऊतांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्याविषयावर बोलताना चंद्रकारत पाटील म्हणाले की, संजय राऊत हे खूप मोठे आहेत, त्यांच्यावर बोलण्यासाठी मी खूप छोटा माणुस आहे, असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

शेतकऱ्यांचे हाल झाले

शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटामुळे नुकसान सोसावे लागले. अनेक शेतात माती खरडून गेली. शेतकऱ्यांना जाहीर झालेले हेक्टरी नुकसान भरपाईचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली. तसेच कोकणात झालेल्या नुकसानाची अजुनही भरपाई देण्यात येत आहे. निम्म्या लोकांची कर्जमाफी झालेली. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेले प्रोत्साहन अनुदानही देण्यात आलेले नाही. संपुर्ण कोरोनाच्या कालावधीत शेतकऱ्यांना बियाणे खतं कमी आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यासाठी रांगा लावाव्या लागल्या. अनेक शेतकऱ्यांना खोटी बियाणे मिळाली. या सरकारच्या काळात एकही विमान कंपनी शेतकऱ्यांच्या विम्यासाठी पुढे आली नाही अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ

शाळा कधी सुरू होणार यावरून रोज नवनवीन घोषणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. युजीसीने फटकारल्यानंतर घाईत परीक्षा घेण्यात आला. परीक्षा कशाबशा उरकून टाकल्या, त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यामुळे कोरोनातले ग्रॅज्युएट म्हणून या विद्यार्थ्यांवर शिक्का बसणार आहे. संपुर्ण वर्षभरात महिलांवरही अन्याय व अत्याचाराचे प्रमाण वाढले. त्यामध्ये बीडमध्ये मुलीवर अॅसिड टाकल्याची घटना ही ताजी आहे. आरक्षणाच्या बाबतीत केलेले घोळ यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. आता दोन परिपत्रक काढली आणि मराठा विद्यार्थ्यांना ओपन समाज म्हणून ग्राह्य मानले जाईल. पुर्णपणे मराठा आरक्षण विषयाचा सत्यानाश करण्यात आला आणि ओबीसी समाजालाही अस्वस्थ केलं. या सरकारने जातीजातीमध्ये तेढ निर्माण केली असल्याचेही ते म्हणाले.

पुर्णपणे अपयशी सरकार

संपुर्ण वर्षभराच्या कालावधीत ठाकरे सरकारला कोणतीही ठोस कामगिरी करता आली नाही. या संपुर्ण वर्षभरात प्रत्येक पातळीवर ठाकरे सरकारचे वाभाडे निघाले आहेत. दुधाच्या दरापासून, मंदिर, वीजबिलाचा विषय अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत आम्ही विरोधी पक्ष म्हणून संघर्ष केला. आगामी कालावधीतही हा संघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -