घरमुंबईकेमिकलच्या अभावामुळे एक महिना रक्तचाचणी बंद

केमिकलच्या अभावामुळे एक महिना रक्तचाचणी बंद

Subscribe

सेंट जॉर्ज रुग्णालयातील प्रकार : रुग्णांची गैरसोय

भाग्यश्री भुवड

सेंट जॉर्ज रुग्णालयात थॅलेसेमियाचे निदान करणारी ‘सीबीसी’ टेस्ट केली जाते. पण ही चाचणी गेल्या एक महिन्यापासून बंद असून याचा फटका रुग्णांना बसत आहे. ही चाचणी करण्यासाठी लागणारे रि-एजंट हे केमिकल उपलब्ध नसल्याने सदर चाचणी बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

यामुळे चाचणी बंद

शासकीय रुग्णालयांपैकी केवळ सेंट जॉर्ज रुग्णालयातच ‘थॅलेसेमिया डे केअर सेंटर’ आहे. या ठिकाणी थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करुन त्यांना रक्त चढवलं जात. थॅलेसेमियाचे निदान करण्यासाठी सीबीसी टेस्ट महत्त्वाची असते. पण या साठी लागणारे रि- एजंट केमिकल रुग्णालयात नसल्याची धक्कादायक माहिती सेंट जॉर्जच्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. शिवाय या केमिकलचे बील थकीत असल्यामुळे केमिकलचा सप्लाय होत नसल्याचा खुलासा देखील कर्मचाऱ्याने केला आहे.

- Advertisement -

डॉक्टरांकडूनही खुलासा

सीबीसी टेस्टसाठी लागणारं रि-एजंट केमिकल रुग्णालयात उपलब्ध नसण्याच्या बातमीला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी देखील दुजोरा दिला आहे. रुग्णालय आणि बाह्यरुग्ण विभागात या टेस्टसाठी जवळपास शंभर ते दीडशे रुग्ण दररोज येतात. या टेस्टसाठी रुग्णांकडून तीस ते चाळीस रुपये घेतले जातात, असे गायकवाड यांनी सांगितले.

” सीबीसी टेस्टसाठी रि-एजंट नावाचं केमिकल लागतं. याविषयी हाफकिनशी बोलणं सुरू आहे. रि-एजंटचं बील थकल्यामुळे या केमिकलचा सप्लाय रुग्णालयात झालेला नाही. पण, लवकरच हे केमिकल उपलब्ध होईल. “
डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -