घरमुंबईठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 'दिवाळी भेट'

ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट’

Subscribe

यंदा कोणत्याही कामगार संघटनेच्या मागणीशिवाय प्रशासनाने मागील वर्षी प्रमाणेच कर्मचार्‍यांना १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे पालिकेच्या आस्थापनात काम करणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून १५ हजार ५०० रुपये देण्यात येणार असल्याची माहिती म्युनिसीपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी दिली आहे. तर महापालिकडे कंत्राटी स्वरूपात असलेल्या २ हजार कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याच्या मागणीला पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिली आहे. यंदा पालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात ४०० रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.


हेही वाचा  – राज्यात ‘ठाणे महापालिका’ अव्वल; राज्यस्तरीय सर्वोच्च पुरस्कार

- Advertisement -

८.३३ टक्के सानुग्रह अनुदानाला मंजुरी

ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव चिटणीस चेतन आंबोणकर यांनी घेऊन पालिका कर्मचारी यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानाबाबत चर्चा करून पालिका कर्मचारी यांना १५ हजार ५०० रुपये अनुदान नेत्याच्या प्रस्तावावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिली आहे. मागील वर्षी कर्मचाऱ्यांना १५ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदाच्या सानुग्रह अनुदानात ४०० रुयपांची वाढ केल्याचे रवीराव यांनी सांगितले आहे. तर यंदाच्या सानुग्रह अनुदानापोटी पालिकेच्या ८ हजार २७८ कर्मचाऱ्यांना १२ कोटी ८३ लाख रुपये खर्च होणार आहेत. याच बैठकीत म्युनिसिपल लेबर युनियनद्वारे पालिका बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, घंटागाडी, रस्ते साफ सफाई, शिक्षण विभाग, मलनिस्सारण विभाग, पाणी खाते, उद्यान विभाग, फायलेरिया इतर विभागातील २५०० कंत्राटी कर्मचारी यांना यंदा एक पगार बोनस म्हणजेच ८.३३ टक्के बोनसही मंजुरी दिल्याचे राव यांनी सांगितले असून रवीराव यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल, महापौर मीनाक्षी शिंदे, अतिरिक्त आयुक्त-१ आणि २ उपायुक्तरवीराव आदि उपस्थित होते.


हेही वाचा – कर वसुलीत ठाणे महापालिका अव्वल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -