घरताज्या घडामोडीबहिणीवर अत्याचार करणाऱ्या भावाला १० वर्षे कारावास

बहिणीवर अत्याचार करणाऱ्या भावाला १० वर्षे कारावास

Subscribe

बहिणीवर अत्याचार करणाऱ्या भावाला १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

बहिणीवर अत्याचार करणाऱ्या चुलत भावाला ठाणे न्यायालयाने दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१८ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, या आरोपीला न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

नेमके काय घडले?

नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणीवर तिच्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना २०१८ मध्ये घडली होती. या घटनेनंतर आरोपीने या घटनेची माहिती तिच्या मैत्रिणीला दिली. त्यानंतर त्यांनी सानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेची दखल घेत आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी ठाणे न्यायालयात झाली. या प्रकरणात पीडितेसह तिची आई आणि आजोबा फितूर झाले होते. मात्र, तिची मैत्रीण, शिक्षक आणि डॉक्टरांनी दिलेल्या महत्वपूर्ण साक्षीनंतर आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मैत्रिणीला दिली होती. त्यानंतर त्या मैत्रिणीने शिक्षिकेला माहिती दिली आणि त्यांच्या साक्षीने त्या आरोपीला पोलिसांनी १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक: स्थलांतरीतांमुळे ठाणे जिल्ह्यात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढतंय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -