घरमुंबईफेरिवाले पुन्हा त्याच जागेवर; पालिकेची कारवाई कुचकामी

फेरिवाले पुन्हा त्याच जागेवर; पालिकेची कारवाई कुचकामी

Subscribe

मागील काही महिन्यांपासून मुंब्रा कौसा प्रभाग समिती क्षेत्र वगळता इतर प्रभाग समित्यांमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, असा आरोप महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वच प्रभागामधून फेरीवाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. महापालिकेचे 9 सहाय्यक आयुक्त या फेरीवाल्यांकडून हफ्ते घेत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी केला. यावर महापौरांनी फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तर ठामपा आयुक्त संजीव जैसवाल यांनीही संबंधित विभागाला तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाकडून ठाण्यातील सर्व प्रभागामध्ये फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र रविवारच्या सुट्टीचा दिवस असल्याने फेरिवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान मांडले. त्यामुळे हा कारवाईचा फार्स ठरला आहे.

ठामपाच्या कारवाईत सर्व प्रभाग समिती हद्दीतील 303 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. तर 284 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. काही ठिकाणी फेरीवाल्यांच्या गाड्या जप्त करण्याऐवजी या गाड्या जागेवरच तोडण्यात आल्या. ठाणे महापालिकेने फेरीवाल्यांच्या विरोधात सुरू केलेली कारवाई कायम ठेवली असून एका दिवसात 300 फेरीवाल्यांवर कारवाई करत 284 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. ठाणे महापालिकेने केलेल्या कारवाईत कोपरीमध्ये 37 फेरीवाले आणि 37 हातगाड्या, नौपाड्यामध्ये 37 फेरीवाले 37 हातगाड्या, वागळे प्रभाग समितीमध्ये 20 फेरीवाले 70 हातगाड्या, अंबिकानगर येथील जवळपास 70 हातगाड्या, 6 बाकडी, 5 लोखंडी टेबल जेसीबीच्या वापराने तोडण्यात आले. तसेच अंबिकानगर येथील कल्पतरू, आशर आयटी जुना पासपोर्ट, रोड नं.16 या परिसरातील 70 हातगाड्या,6 बाकडी,5 लोखंडी टेबल तोडण्यात आले. लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये 39 फेरीवाले 27 हातगाड्या, वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत 52 फेरीवाले आणि 52 हातगाड्या, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये 23 फेरीवाले 10 हातगाड्या, उथळसर प्रभाग समितीमध्ये 15 फेरीवाले 12 हातगाड्या, कळव्यामध्ये 58 फेरीवाले 17 हातगाड्या, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये 15 फेरीवाले 6 हातगाड्या तर दिवा-शीळ प्रभाग समितीअंतर्गत 7 फेरीवाले आणि 16 हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र शनिवार रविवार सुट्टी आल्याने फेरिवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान आपल्या जागी मांडले आहे.

- Advertisement -

वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीतील हिरानंदानी हिरानंदानी मेडोज परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र फेरीवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान या ठिकाणी मांडले आहे. याबाबत फेरीवाल्यांना विचारले असता ते म्हणाले, ये तो रोज का है। कारवाई हमेशा चलती है। हम हमारा काम करते है, वो उनका काम करते है।

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई करण्यात आली. सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्तांच्या अधिपत्याखाली ही मोहिम सुरूच राहणार आहे. या धडक कारवाईमुळे नागरिकांसाठी शहरातील रस्ते मोकळे झाले असून या कामी महापालिकेस सहकार्य करावे.
-अशोक बुरपल्ले, उप आयुक्त, अतिक्रमण आणि निष्कासन विभाग ठामपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -