घरमुंबईपालिकेचे ट्विट, आयुक्तांचे आवाहन; पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण

पालिकेचे ट्विट, आयुक्तांचे आवाहन; पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण

Subscribe

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण झाली असून त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खुद्द आयुक्तांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यूची लागण झाली असून त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खुद्द आयुक्तांच्या पत्नी आणि मुलीला डेंग्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. डेंग्यू, मलेरियापासून बचावासाठी पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी, याबाबत आयुक्तांनी २० जून रोजी जनतेला सूचना आणि आवाहन केले होते.

महापालिकेने हे आवाहन ट्ििवटरवर टाकले होते. मात्र, पालिका आयुक्तांच्याच घरात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. जयस्वाल यांचे घर वांद्रे भागात आहे. हा परिसर मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येतो. त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्तांच्या घराची महापालिकेच्या निर्देशानुसार तपासणी करण्याची गरज आहे.

- Advertisement -

एखाद्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळल्यावर संबंधित परिसराची तपासणी महापालिकेकडून केली जाते. सर्व सामान्यांविषयी कर्तव्य कठोर असलेली मुंबई महापालिका आता ही कारवाई करणार का ,असे विचारले जात आहे.
मुंबईतील वांद्रे येथे परिसरात आयुक्त जस्वाल यांचे कुटूंब राहते. त्यांची पत्नी सिद्धी जयस्वाल आणि मुलगी स्नेहा जयस्वाल यांना डेंग्यू झाल्याने त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सर्वच महापालिकेच्या आरोग्य व वेद्यकीय विभागांकडून घरात डेंग्यूच्या अळ्या होऊ नयेत, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जाते. मात्र हे आवाहन आयुक्तांनीच पाळले नाही का, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात होत आहे. यासंदर्भात आयुक्त जयस्वाल यांच्याशी फोनवरून संपर्क होऊ शकला नाही.

- Advertisement -

काय आहे ठाणे पालिकेचे ट्विट

कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. असे आवाहन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले होते. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वापरावे, इमारतीमधील घरातील, पिण्याच्या पाण्या साफ कराव्यात, शिळे, उघड्यावरील व कापलेली फळे खाऊ नयेत. स्वतःच्या घरातील अथवा आजूबाजूच्या घरातील हिवताप, डेंगू फिवर, कावीळ, हगवण, विषमज्वर इत्यादी साथीच्या रोगांनी आजारी असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती त्वरित नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन जयस्वाल यांनी केलं होते.

 

ठाणे महापालिका आयुक्त वांद्रे येथे नेमके कुठे राहातात हे माहित नाही. पण त्यांची इमारत शोधून आयुक्तांचे घर तसेच                तेथील सर्व रहिवाशांच्या घरांची तपासणी करू. त्यासाठी आम्ही विशेष टीम तयार केली आहे.                                   -राजन नारिंग्रेकर, प्रमुख, किटकनाशक विभाग, मुंबई महापालिका

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -