घरमुंबईठाण्यातील 'या' ठिकाणांना पाणी साचण्याचा, दरड कोसळण्याचा धोका

ठाण्यातील ‘या’ ठिकाणांना पाणी साचण्याचा, दरड कोसळण्याचा धोका

Subscribe

आगामी मानसुनचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १४ ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याचा आणि २६ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या ठिकाणांची नावे जाहिर केली आहे.

एकीकडे निवडणुकीची धामधुम सुरु आहे, तर दुसरीकडे ठाणे महापालिका येणाऱ्या मानसुनचा सामना करण्यासाठी तयारी करीत आहे. त्यानुसार आगामी मानसुनमध्ये १४ ठिकाणची यादी तयार केली असून ज्या ठिकाणी पाणी साचण्याचा धोका संभावू शकतो. तर दरड कोसळू शकणाऱ्या २६ ठिकाणांची यादी पालिकेने जाहीर केली आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १४ ठिकाणे अशी आढळली की, जिथे यंदाच्या पावसाळ्यात पाणी साठू शकणार आहे. मागील काही वर्षांपूर्वी हा आकडा २६ च्या घरात होता. परंतु पालिकेने केलेल्या उपाय योजनांमुळे आता हा आकडा कमी झाला आहे. त्यानुसार ठाणे शहरातील राम मारु ती रोड, गोखले रोड, राम गणेश गडकरी रंगायतन, सॅटीस पुलाखाली, मासुंदा तलाव, वंदना टॉकीज, देवनायर सोसायटी, वंदना टॉकीज, गजानन महाराज चौक, देवधर रुग्णालय, जिजामाता मार्केट, पंपीग स्टेशन, चव्हाण चाळ, वृदांवन आणि श्रीरंग सोसायटी, पंचामृत, आयसीआयसीआय बँक घोडबंदर रोड, विटावा सबवे आणि दिवा गाव परिसरात पाणी साठू शकणार आहे. तर प्रभाग समितीनिहाय पाणी साठण्याची ठिकाणांमध्ये नौपाडा -८, उथळसर-२, माजिवडा-मानपाडा -२, कळवा -१ आणि मुंब्रा -१ आदिचा समावेश आहे.

या ठिकांणी दरड कोसळण्याची शक्यता

दुसरीकडे पालिका हद्दीत २६ ठिकाणांवर पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका आहे. महत्वाचे म्हणजे याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने वारंवार या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नोटीसा बजावण्यात येत आहेत. परंतु तरीही येथे रहिवासी आजही वास्तव्य करताना दिसत आहेत. दरड कोसळणाऱ्या ठिकाणांमध्ये प्रभाग समिती निहाय रायलादेवी -१२, माजिवडा मानपाडा -२, कळवा- ६, मुंब्रा-५ आणि वर्तकनगर-१ अशा भागांचा समावेश आहे. यामध्ये संतोष नगर, पाटील नगर, डक्ट लाईन, रेल्वे वसाहत सेंट उलाई शाळा, हनुमान नगर, शंकर मंदिर, इंदिरानगर टेकडी, रु पादेवी, भास्करनगर, पौंड पाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबा नगर, गावदेवी मंदिर (मुंब्रा), केणी नगर, कैलासनगर, आझादनगर, सैनिक नगर, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कशेळी पाडा, गुरदेव आश्रम आणि उपवन आदी ठिकाणांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -