घरमुंबईकरवसुली उद्दीष्टासाठी ठाणे पालिकेचे जोरदार प्रयत्न

करवसुली उद्दीष्टासाठी ठाणे पालिकेचे जोरदार प्रयत्न

Subscribe

ठाणे महापालिका प्रशासनाने मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 600 कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 446 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. माजिवाडा मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक 118 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मुंब्रा आणि वागळे इस्टेट परिसरातून जेमतेम 17 ते 18 कोटी रुपयांची करवसुली झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरातील 1हजार 400 रहिवासी मालमत्ता जप्त करण्यात आल्या तर 1हजार 200 व्यावसायिक मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले असल्याची माहिती ठामपाच्या सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामांत व्यग्र होतील. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्यात येऊन ठामपाने डिसेंबरच्या आधीपासूनच मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली होती. यामध्ये मालमत्तांचा लिलाव, जप्तीची कारवाई आदींसह इतर मोहीमाही हाती घेण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

दरम्यान 7 मार्च 2019 पर्यंत मालमत्ता कर विभागाने चार लाख 75 हजार 915 मालमत्ताधारकांकडून 446.74 कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी याच तारखेला ही टक्केवारी 446.41 कोटी एवढी होती. 7 मार्चपर्यंत चार लाख 75 हजार 915 मालमत्ताधारकांकडून पालिकेने तब्बल 446.74 कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी हीच वसुली 446.41 कोटी एवढी होती. येत्या 20 दिवसात उद्दीष्ट पूर्ण होईल, असा दावा महापालिकेने केला आहे. मालमत्ता कर विभागाला यंदा 600 कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु आता 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने त्या उद्दीष्टापर्यंत पोहचणे कदाचित मालमत्ता कर विभागाला शक्य होणार नाही. त्यामुळे हे उद्दीष्ट 40 कोटींनी कमी करण्यात येऊन ते 560 कोटी निश्चित करण्यात आल्याची माहिती ठामपाच्या सूत्रांनी दिली.

कळवा प्रभाग समितीमधूनसुध्दा 52 हजार 247 मालमत्ताधारकांकडून 21.53 कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षी हा आकडा 23.35 कोटी एवढा होता. त्यानंतर लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये तर वसुली जास्त घटली असल्याचे स्पष्ट होत असून येथून आतार्पयत 21.17 कोटी वसुली झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 40.36 कोटींची वसुली झाली होती. उथळसर प्रभाग समितीमधून 31.75 कोटींची वसुली असून मागील वर्षी 43.09 कोटींची वसुली झाली होती. तर वागळे इस्टेट प्रभाग समितीची वसुलीसुध्दा कमी झाली असून ती 18.07 कोटी एवढी आहे. तर नौपाडा प्रभाग समितीमधून 69.83 कोटी, माजिवडा मानपाडा 118.89 कोटी, वर्तकनगर 67.22 कोटी आणि मुख्य कार्यालयातील वसुली 50.76 कोटी अशी जास्तीची वसुली झाली आहे. मुंब्रातून 56 हजार 665 मालमत्ताधारकांकडून केवळ 17.29 कोटींची वसुली झाली आहे. तर दिव्यातून 89 हजार 83 मालमत्ताधारकांकडून 30.23 कोटींची वसुली झाली आहे. मागील वर्षी या दोन्ही प्रभाग समितीमधून 50.83 कोटींची वसुली झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -