घरमुंबईसेना फेकाडी तर राष्ट्रवादीची लायकी नाही

सेना फेकाडी तर राष्ट्रवादीची लायकी नाही

Subscribe

ठाणे पालिकेच्या महासभेत राजकीय चिखलफेक

निवडणुकीत शिवसेनेने मुंबई आणि ठाणे शहरातील प्लॅटधारकांना आपल्या वचननाम्यात 500 फुटांच्या घरांबाबत मालमत्ताकर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर मुंबईमध्ये या वचननाम्याची पूर्ती करण्यात आली. ठाणे शहरात मात्र सत्ताधारी शिवसेनेचे वचन हवेत विरल्याची खरपूस टीका मंगळवारी पालिकेच्या महासभेत राष्ट्रवादी पक्षाने केली. त्यांनी शिवसेनेला ‘फेकाड्या’ म्हणून संबोधले. तर सभागृहात सभागृह नेते यांनी इट का जबाब पत्थरसे देत राष्ट्रवादीची लायकी निवडणुकीत महाराष्ट्रात दिसल्याचे प्रतिउत्तर दिले. त्यानंतर सभागृहात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या.

राष्ट्रवादीने केलेल्या आरोपांवर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी राष्ट्रवादीला उत्तर देत सांगितले. मुंबईत झाले ठीक आहे. आमची आणखीन अडीच वर्षे आहेत. आम्हीही वचननामा अमलात आणू असे उत्तर दिले. दरम्यान राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात सांगितले. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या 500 फुटांच्या घरांबाबत कर माफीची सूट देण्याच्या आदेशावर सही केली तेव्हा ठाण्याबाबत विचारण्यात आले होते. परंतु पालिका प्रशासनाने प्रस्ताव दाखल केला नसल्याचे नजीब मुल्ला यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -