घरCORONA UPDATEठाणे: आता कोरोना बाधित रुग्णांसाठी करा ऑनलाईन बेड बुकिंग!

ठाणे: आता कोरोना बाधित रुग्णांसाठी करा ऑनलाईन बेड बुकिंग!

Subscribe

सदरची प्रक्रिया सुलभ आणि सोयिस्कर व्हावी आणि प्रत्येक गरजू रूग्णांना बेड उपलब्ध व्हावा अशा सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

कोरोना बाधित रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोयिस्कर व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने Online बेड अलोकेशन सिस्टम तयार करण्यात आली असून त्यासाठी www.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान कोविड 19 बाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याकरिता कॅाल सेंटरही कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा.विपिन शर्मा यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश गणेश म्हस्के यांच्या उपस्थितीत या App वर अनावरण झाले होते. कोरोना साथीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याअनुषंगाने कोविड तपासणी अंती पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार रूग्णांचा क्लिनिकल स्टेटस काय आहे? त्या आधारावर त्यास कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेस्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॅास्पीटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

सदरची प्रक्रिया सुलभ आणि सोयिस्कर व्हावी आणि प्रत्येक गरजू रूग्णांस बेड उपलब्ध व्हावा अशा सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हा निर्णय घेतला.

महापालिकेने बनविलेल्या www.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक उघडल्यानंतर रूग्णांना आवश्यक ती माहिती वेबलिंक द्वारे उपलब्ध करून दिलेल्या फॅार्मवर भरून सादर केल्यानंतर ती माहिती महापालिका मुख्यालयामधील मध्यवर्ती बेड आयलोकेशन पथकाला प्राप्त होईल. रूग्णाने दिलेल्या माहितीच्या आधारे त्या रूग्णांस क्लिनिकल स्टेटसनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेस्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॅास्पीटलमध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे त्याचा निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर रूग्णाने रूग्णावाहिकेची मागणी केल्यास त्याची माहिती ॲम्ब्युलन्स टीमकडे जाईल. त्यानंतर सबंधित रूग्णांस सेंट्रल बेड अलोकेशन टीम आणि रूग्णवाहिकेची माहिती असणारा संदेश पाठविण्यात येईल. रूग्णांच्या मागणीनुसार त्यास कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेस्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॅास्पीटल यापैकी कोठे दाखल करावयाचे आहे त्यानुसार दाखल करण्यासाठी रूग्णावाहिका उपलब्ध करून देण्यात येईल.

- Advertisement -

सदर रूग्ण रूग्णवाहिकेमध्ये बसल्यानंतर त्याच्या मोबाईलवर पाठविण्यात आलेला ओटीपी क्रमांक विचारण्यात येईल तो ओटीपी क्रमांक दिल्यानंतर रूग्णांस संबंधित रूग्णलयामध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येईल आणि तसा अहवाल कोविगार्ड डॅशबोर्डच्या माध्यमातून संबंधित रूग्णालयासही कळविण्यात येईल. याबाबतची कार्यपद्धती या वेबलिंकवर देण्यात आली आहे.


हे ही वाचा – धोकादायक! मोबाईलमधील ‘हे’ App करतायत हेरगिरी, त्वरीत काढून टाका!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -