घरमुंबईठाण्याच्या महापौरांना धमकी देणाऱ्या ४८ तासात अटक; मुख्य सूत्रधाराची उकल नाही!

ठाण्याच्या महापौरांना धमकी देणाऱ्या ४८ तासात अटक; मुख्य सूत्रधाराची उकल नाही!

Subscribe

गुरुवारी ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दाऊत इब्राहिमच्या गुंडाचा धमकीचा फोन आला होता. या धमकी देणाऱ्या गुंडाला ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांनी ४८ तासात अटक केली आहे.

महापौर मिनाक्षी शिंदे यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचं नावाने धमकीच्या फोन प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांनी आरोपी वासिम सादिक मुल्ला याला ४८ तासात अटक केली. मात्र, आरोपीने कोणाचं सांगण्यावरून फोन केला हे पोलिसांना अद्याप कबूल केलं नाही. १७ सप्टेंबर रोजी बाराच्या सुमारास ठाण्यातच्या महापौर शिंदे यांना अज्ञात इसमाने फोन करून “मी डोंगरी वरून दाऊदचा माणूस बोलतोय तुम्हाला उचलून नेऊ आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास देऊ. तुम्ही हिशोबात रहा”, अशी फोनवरून धमकी आल्याने. महापौरांनी बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

धमकीचा फोन आल्याने ठाण्यात चिंतेचे आणि तणावाचे वातावरण

दरम्यान पोलिसांनी तपासाबाबत गुप्तता बाळगली होती. गुन्ह्यात वापरलेले ते मोबाईल सीम कार्ड हे मुंब्रा मधील एका इसमाच्या नावे असल्याचा खुलासा झाला होता. एका इसमाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी ठाण्याच्या महापौरांना गॅंगस्टरने फोन केल्याने ठाण्यात चिंतेचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गुरुवारी शिवसेना महिला आघाडी आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी आयुक्तांना निवेदनात दिला होता. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी धमकी देणाऱ्या इसमाला लवकर पकडण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

हेही वाचामहापौर धमकी प्रकरणी मुंब्यातून एक ताब्यात

महापौरांना फोन केल्याचे कबुल

त्यानुसार ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सिमकार्ड चौकशी करून फोन धारकाचा मागोवा घेऊन महापौरांना धमकी देणारा इसम वासिम सादिक मुल्ला याला मुंब्रा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने महापौरांना फोन केल्याचे कबुल केले. महापौरांना धमकीचा फोन करण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाइल फोन हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊदच्या टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना दाऊदच्या टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 19, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -