रक्षाबंधनसाठी ठाण्यात रविवारीही टपालसेवक कार्यतत्पर, विशेष राखी टपाल पोहोचवणार!

Thane
post office
प्रातिनिधिक फोटो

यंदा करोनाच्या वातावरणात राखी पौर्णिमेला बहिणीला भावाकडे राखी बांधायला जाणे शक्य होणार नाही. अशावेळी टपालखाते मदतीला पुढे सरसावले आहे. या वर्षी विशेष राखी पाकीट उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व टपाल कार्यालयात हे राखी पाकीट दहा रुपये या माफक किंमतीला उपलब्ध आहे. त्या पाकिटामधून भावाला राखी सुरक्षितपणे जाणार आहे. सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे त्याआधी राख्या आपापल्या पत्त्यांवर पोहोचाव्यात, यासाठी ठाण्यात रविवारी देखील टपाल सेवक कामावर हजर राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाणे विभागात सर्व टपाल कार्यालयात राखी पाकिटाचे बुकिंग करण्यासाठी काउंटर उघडले असून, राखी पाकिटे ट्रे मध्ये लगेच वेगळी करून पुढील गंतव्य स्थानाकडे पाठविण्याची व्यवस्था केली आहे. तसेच राखी मेल अंतर्गत त्याच्या वितरणाला प्राधान्य देण्यात येत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. तसेच प्रवासाकरिता वाहतुकीची व्यवस्थाही उपलब्ध नाही. त्यामुळे यंदा रक्षाबंधन साजरे होण्यासाठी टपाल खाते पुढे सरसावले आहे. राख्या पोहोचवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातही विशेष काळजी घेऊन केवळ राखी मेलची डिलिवरी सर्व विभागातील टपाल कार्यालयात रविवारी सुट्टीच्या दिवशीही केली जाईल, असे नवी मुंबई रिजनच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here