माथेफिरुच्या स्टंटबाजीमुळे लोकलचा खोळंबा

ठाण्यात एक माथेफिरु व्यक्ती रेल्वेच्या खांबावर चढल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल झाले आहेत.

Mumbai
Thane railway station one man climb high powered electric pole of railway
माथेफिरुच्या स्टंटबाजीमुळे लोकलचा खोळंबा

बऱ्याचदा तांत्रिक बिघाड, पेंटाग्राफ तुटल्याने आणि रुळाला तडे गेल्यामुळे रेल्वेचा खोळंबा होतो. मात्र, आज एका वेगळ्याच कारणांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाण्यात एक माथेफिरु व्यक्ती रेल्वेच्या खांबावर चढल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाला. हा माथेफिरु विद्युत खांबावर चढल्याचे कळल्यानंतर रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. रेल्वेने तात्काळ खांबांवरील विद्युत पुरवठा खंडित केल्याने संभाव्य दुर्घटना टळली आहे. मात्र, ऐन गर्दीच्यावेळी हा व्यक्ती खांबावर चढल्याने लोकलमध्येच थांबल्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते.

ठाणे स्टेशनच्या विद्युत खांबावर चढला मनोरुग्ण तरुण

ठाणे स्टेशनच्या विद्युत खांबावर मनोरुग्ण तरुण चढल्यामुळे वाहतूकीला लागला ब्रेक

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 14, 2019

नेमके काय घडले?

ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर १ आणि २ च्या मध्ये असलेल्या विद्युत खांबावर आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. मंगल नावाचा एक मनोरुग्ण व्यक्ती ठाणे रेल्वे स्थानकातील विद्युत खांबावर चढला होता. या खांबावरुन उच्च विद्युत्त प्रवाह असणाऱ्या वायरी होत्या. त्या विद्युत खांबावर मनोरुग्ण चढल्याचे दिसताच प्रवाशांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तर काही प्रवाशांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले. त्यानंतर रेल्वे प्रशासानाने तात्काळ विद्यूत पुरवठा खंडित केला. त्यामुळे लोकलचा खोळंबा झाला होता. रेल्वेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नसल्याने जवानांची तारांबळ उडाली. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर त्याला खांबावरून उतरविण्यात आले असून रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा – ‘शॉपिंग ऑन व्हिल’ साठी पश्चिम रेल्वेचा पुन्हा आटापिटा