घरमुंबईठाणे रेल्वे स्थानकातील 20 प्रवेश मार्ग होणार बंद

ठाणे रेल्वे स्थानकातील 20 प्रवेश मार्ग होणार बंद

Subscribe

ठाणे स्थानकातून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा होत असते. अनेक लोकल फेर्‍या होत असतात. ठाणे स्थानकात प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. स्कायवॉक आणि रेल्वेचे पूल जोडलेले असल्याने येणार्‍या जाणार्‍या गर्दीवर नियंत्रण नाही. शिवाय कळव्याच्या दिशेने रुळावरुन चालत येऊन ठाणे रेल्वे स्थानकात प्रवेश करता येतो. जीआरपी पोलीस स्थानकाच्या येथून फलाट क्रमांक एकला प्रवेश करता येतो. तर कोपरी येथूनही रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याचा मार्ग आहे. यातून ठाणे स्थानकाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील 27 पैकी 20 प्रवेश मार्ग बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचे मत ठाणेकर प्रवाशी व्यक्त करत आहेत.

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी असलेल्या 27 मार्गांमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या विभागली जाऊन स्थानकातली गर्दी कमी होण्यास मदत होते. असे असताना निव्वळ बेकायदेशीर असल्याच्या नावाखाली त्यातील 20 मार्ग बंद करण्याऐवजी योग्य ती सुरक्षा व्यवस्था नेमून प्रवाशांची प्रवेश बंदी टाळावी आणि गर्दीच्या वेळी सुटसुटीतपणा येण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ठाणे रेल्वे स्थानकात सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर अत्याधुनिक यंत्रणेचे पर्याय असताना 20 मार्ग बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

- Advertisement -

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांची कोंडी होऊन चेंगराचेंगरीसारखी धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळात रेल्वे प्रवाशांचा लोंढा पूर्व आणि पश्चिमेकडे वळत असतो. त्यातच सॅटीस सारख्या प्रकल्पामुळे आणि रिक्षा चालकांच्या बेशिस्तीमुळे ठाणे स्थानकाबाहेरील गर्दीत आणखी भर पडत असते. असे असताना 27 पैकी 20 मार्ग बंद करून रेल्वे प्रशासन आणखी असुरक्षितता निर्माण करत आहे. सुरक्षेच्या नावाखाली ठाणेकरांवर लादण्यात येणारा हा चुकीचा असल्याचे मत धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -