ठाण्यात मागील वर्षापेक्षा ५ हजार मिमी जास्त पावसाची नोंद

मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने ठाणे आणि आसपासच्या परिसरात पूर स्थिती निर्माण झाली होती.

Thane
Thane records 5,000 mm more rainfall than last year
बदलापूरमधील पूरपरिस्थिती

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्ट महिन्याच्या पहिले दोन आठवडे राज्यात धुवाँधार पाऊस बरसला. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. कोल्हापू-सांगलीमधील पूराने मागील अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडला. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली भागांमध्येही या कालावधीत मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे बदलापूर, दिवा, डोंबिवली येथील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. तेथील पूरग्रस्तांनाही प्रचंड आर्थिक नुकसानीला समोरे जावे लागले. मागील दीड महिन्यात ठाण्यात तब्बल २० हजार ३२१ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५ हजार मिमी अधिक पाउस झाल्याचेही सांगण्यात आले आहे. यावरून ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर येथील पूराचे कारण स्पष्ट होण्यासदेखील मदत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – पूरग्रस्तांसाठी मनसेची डोंबिवलीतील दहीहंडी रद्द

मागील वर्षीपेक्षा ५ हजार मिमी जास्त पाऊस

गेल्या आठवडाभरापासून ठाणे जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. असे असले तरी ठाण्यात आतापर्यंत अवघ्या दीड महिन्यात तब्बल २० हजार ३२१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. गेल्यावर्षी पेक्षा आतापर्यंत ५ हजार मिमी अधिक पाऊस पडला आहे. या आकडेवारीवरून ठाणे आणि आजुबाजूच्या शहरांमध्ये आलेल्या पूरामागील कारण स्पष्ट होण्यास मदत होईल. मागील दोन आठवड्यात ठाणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले. जिल्ह्यातील बारवी आणि भातसा धरण भरून वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे ठाण्यासह आजुबाजूच्या शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे हजारो लोकांचे संसार पाण्याखाली गेले होते.

१३ ऑगस्ट २०१९ पर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)

शहर              पाऊस

ठाणे              ३ हजार १६७ मिमी
कल्याण         २ हजार ९८६ मिमी
मुरबाड          २ हजार ४४१ मिमी
उल्हासनगर    ३ हजार ६५ मिमी
अंबरनाथ        २ हजार ७४१ मिमी
भिवंडी          ३ हजार ९९ मिमी
शहापूर         २ हजार ८२२ मिमी
एकूण           २० हजार ३२१ मिमी