घरमुंबईठाणे परिवहन सेवेचा अर्थसंकल्प

ठाणे परिवहन सेवेचा अर्थसंकल्प

Subscribe

ठाणेकरांवर दरवाढ नाही

ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे (टीएमटी) सन २०१९-२० सुधारित आणि सन २०२०-२१ चे मूळ बजेट परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी परिवहन समितीला सादर केले. सुधारित बजेट महसुली आणि भांडवली खर्चासह ३०३ कोटी ५३ लाख रुपयांचे असून, सन २०२०-२१ चे मूळ बजेट महसुली आणि भांडवली खर्चासह ४३८ कोटी ८६ लाख रुपयांचे आहे. ठाणेकरांवर कोणतीही नवीन दरवाढ या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेली नाही.ठाणे परिवहन समितीवर २ वर्षांपासून सदस्यांची रखडलेली नियुक्ती येत्या काही दिवसात होणार आहे. तूर्त परिवहन समितीचे सभापतीपद रिक्त असल्याने सदस्यांनी निवडलेले प्रभारी सभापती राजेंद्र महाडिक यांना हे बजेट सादर करण्यात आले. सद्य:स्थितीत परिवहन सेवेच्या ताफ्यात असलेल्या एकूण ४६७ बसेस आहेत. त्यापैकी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या २७७ बसेस असून त्यातील सरासरी ११० बसेस रस्त्यावर धावत आहेत.

तर १९० बसेस जीसीसी तत्वावर चालवण्यात येत आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात सीएनजीच्या १०३ बसेस दुरुस्त करून चालवण्यात येणार आहेत. केवळ माहिलांकरता शासनाकडून मंजूर झालेल्या झालेल्या ५० तेजस्विनी बसेसपैकी ३० बसेस दैनंदिन वापरात आहेत. उर्वरित २० बसेस मार्चअखेरपर्यंत परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. याशिवाय परिवहन निधीतून ५० नवीन मिडी बसेस खरेदी करण्याचे नियोजन असून, जून २०२० अखेरपर्यंत परिवहन सेवेच्या बस ताफ्यात त्या बसेस दाखल होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. परिवहन सेवेच्या दैंनदिन ताफ्यातील नादुरुस्त बसेस वगळून सरासरी ४०० ते ४५० बसेस रस्त्यावर उपलब्ध करून ठाणेकरांना चांगला प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन सेवेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. दुसरीकडे महापालिकेकडून दरवर्षी किमान ३५० कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी परिवहन सेवेकडून केली जाते. मात्र यंदा त्यात कपात करून २९१ कोटींच्या अनुदानाची मागणी करण्यात आली असून त्यातील १३० ते १५० कोटी मिळतील, असा परिवहन प्रशासनाचा अंदाज आहे.

- Advertisement -

प्रवासी बसेस भाड्यापोटी रक्कम १४ कोटी ३६ लाख रुपये इतके उत्पन्न अपेक्षित असून, जेएनएनयुआरम – २ अंतर्गत आलेल्या १९० बसेसपासून ५६ कोटी ३४ लाख रुपये इतके उत्पन्न अपेक्षित आहे. वोल्वो बसेस पासूनचे उत्पनन १५ कोटी ८७ लाख रुपये अपेक्षित आहे. तसेच ५० तेजस्वीनी बसेसपासून रक्कम ९ कोटी २० लाख, परिवहन सेवेत नव्याने खरेदी करण्यात येणार्‍या ५० मिडी बसेसपासून ६ कोटी ९१ लाख जुलै २०२० मध्ये १०३ सीएनजी बसेस दुरुस्ती करून उपलब्ध होणार असून, त्यापोटी २२ कोटी ९३ लाख असे एकूण १२५ कोटी ६० लाख रुपये एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. तिकिटविक्री उत्पन्नाव्यतिरिक्त बसेसवरील जाहिरात, विद्यार्थी पासेस, निरुपयोगी वाहन वस्तू विक्रीपोटी, पोलीस खात्याकडून प्रतिपूर्तीपोटी प्रलंबित तसेच इतर किरकोळ उत्पन्न असे एकत्रित २२ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित आहे, असे अंदाजपत्रकातील एकूण महसुली उत्पन्न १४९ कोटी ८१ लाख इतकी उत्पन्नाची जमा रक्कम अपेक्षित आहे.
प्रती किलोमीटर खर्चात मोठी बचत

यापूर्वी प्रती बस एका किलोमीटरचा १११ ते ११७ रुपये खर्च होता. तर उत्पन्न ५० रुपयांच्या जवळपास आहे. खर्चात मोठी बचत करण्यात परिवहन प्रशासन यशस्वी झाले असून खर्च प्रतीकिमी. ९८ रुपयांपर्यंत खाली आला आहे, असे संदीप माळवी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -