ठाण्यात गाड्यांची जाळपोळ; ९ बाईक जाळल्या

ठाण्याच्या पाचपखाडीतील गणेशवाडी भागात ही घटना घडली आहे. अज्ञातांनी ९ बाईक जाळल्या. मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यानची ही घटना आहे.

Thane
thane vehicles burnt case
ठाण्यात गाड्यांची जाळपोळ

ठाण्यामध्ये मध्यरात्री अज्ञातांनी गाड्या जाळल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या पाचपखाडीतील गणेशवाडी भागात ही घटना घडली आहे. अज्ञातांनी ९ बाईक जाळल्या. मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यानची ही घटना आहे. या आगीमधेय सर्व गाड्या जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये ५ होंडा अॅक्टिव्हा, १ होंडा सीबी युनिकॉर्न, १ टीव्हीएस वेगो, १ यामाहा एफ झेड – ५ आणि १ सुझुकी गिक्सेर अशा ९ बाईकचा समावेश आहे.

लोकांमध्ये भीतीचे वातावरण

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या काही मिनिटात आग अटोक्यात आणली. मात्र या आगीत तोपर्यंत गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे स्थानिकांनी भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. याआधी गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला दारु पिताना पोलिसांनी पकडल्यामुळे युवकाने बाईक जाळल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here