घरमुंबईठाणेकरांना आढळला बिबट्याचा बछडा

ठाणेकरांना आढळला बिबट्याचा बछडा

Subscribe

ठाण्यातील येऊर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. बुधवारी मॉनिंग वॉकला गेलेल्या ठाणेकरांना बिबट्याचा बछडा आढळून आल्याने त्यावर शिक्काशोर्तब झाला आहे. मात्र यावेळी ठाणेकरांनी बछड्यासोबत फोटो काढून आनंद व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वीच जन्मलेल्या या बछड्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूपपणे बोरिवलीतील नॅशनल पार्क येथील प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये रवानगी केली आहे. ऐन वस्तीत बिबट्याचे दर्शन घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्कच्या लगतच असलेले येऊरचे जंगल हे ठाण्यातील एक भाग आहे. शांत व निसर्गरम्य, शुध्द हवा असल्याने या ठिकाणी ठाणेकर मॉनिंग वाॅकसाठी येतात. नेहमीप्रमाणे मॉनिंग वॉकसाठी आलेल्या ठाणेकरांना सुखद धक्का मिळाला आहे. एअरफोर्स बेसजवळ ठाणेकरांना बिबट्याने डरकाळी फोडल्यासारखा आवाज झाला. त्यांनी लागलीच ही खबर वनविभागाला दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन शोधाशोध केली असता त्या ठिकाणी २ दिवसांपूर्वी जन्मलेला बिबट्याचा बछडा आढळून आला. मात्र बछड्याची आई जवळपास कुठे असेल या विचाराने कोणी पुढे जायला तयार नव्हते. मात्र बछड्याची आई जवळपास नसल्याची खात्री पटल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बछड्याला अलगद उचलून घेतले. बछडाही शांतपणे खेळू लागला. बछड्याला पाहून ठाणेकरही आनंदी झाले, अनेकांनी त्याच्यासोबत फोटोही काढले.

- Advertisement -

हेही वाचा –

‘कंडोम सोबत ठेवा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -