घरमुंबईमुंबईत पार पडले २८ वे अवयवदान

मुंबईत पार पडले २८ वे अवयवदान

Subscribe

लिलावती रुग्णालयात शनिवारी मेंदूमृत झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतल्याने एका व्यक्तीला जीवदान मिळाले आहे.

मुंबईतील वाढत्या जनजागृतीमुळे अवयवदान करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. लिलावती रुग्णालयात शनिवारी मेंदूमृत झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतल्याने एका व्यक्तीला जीवदान मिळाले आहे. कोरोनामुळे यंदा अवयवदान फार कमी प्रमाणात झाले. मात्र लिलावती रुग्णालयात मृत्रपिंड दान करण्यात आले. हे मुंबईतील २८ वे अवयवदान ठरले आहे.

लिलावती रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या २३ वर्षीय तरुणाचा शनिवारी मेंदूमृत झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी तरुणाच्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत माहिती दिली. तरुणाचे नातेवाईक अवयवदानाबाबत जागरुक असल्याने त्यांनी तातडीने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार डॉक्टरांनी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली अवयवदानाची प्रक्रियेला सुरुवात केली. मेंदूमृत झालेल्या तरुणाचे मृत्रपिंड लिलावती हॉस्पिटलमधीलच एका रुग्णाला देण्यात आले. मेंदूमृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एका व्यक्तीला जीवदान मिळाले आहे. लिलावती हॉस्पिटलमध्ये झालेले हे यशस्वी अवयव प्रत्यारोपण मुंबईतील यावर्षीचे २८ वे अवयवदान ठरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -