चर्चगेट स्थानकावरील गांधीजींचे चित्र हटवले

दुर्घटनेमुळे घेतला निर्णय

Mumbai
Mahatma Gandhi

वादळी वार्‍या सोबत मुसळधार पावसामुळे १२ जून रोजी चर्चगेट रेल्वे स्थानकातील इमारतीवरील महात्मा गांधी यांचे ८० फूटी चित्र असणारे ६ चौकोनी भाग कोसळून एक पादचार्‍याचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले होते. त्यानंतर आता इमारतीवरील असलेले महात्मा गांधींचे ८० फुटी चित्र काढण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला असून याबाबतचे ८० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे.

चर्चगेट स्थानकाच्या सुशोभिकरणानिमित्त आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून महात्मा गांधी यांचे चित्र चर्चगेट स्थानकावरील इमारतीवर उभारण्यात आले होते. मात्र गेल्या आठवड्यात १२ जून रोजी सोसाट्याच्या वार्‍यासोबत आलेल्या चित्रावरील अल्युमिनिअमचे ६ चौकोनी भाग कोसळून दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत मधुकर नार्वेकर या पादचारी प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने सावधगिरी म्हणून ही पावले उचलली आहेत. यासाठी पश्चिम रेल्वेने त्रिसदस्यीस समिती नियुक्त केली होती.

बॉक्सची जोडणी कमकुवत                                                                                                      या प्रकरणाचे गांभीर्य पाहून एका त्रयस्थ संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यात अ‍ॅल्युमिनिअम बॉक्सची जोडणी कमकुवत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण चित्र काढण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला.                    रवींद्र भाकर , मुख्य जनसंपर्क अधिकारी,पश्चिम रेल्वे