चोरीच्या गुन्ह्यात पळून गेलेल्या आरोपीस अटक

Mumbai
अटक

चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या आरोपीस काही तासांतच विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. अफजल आयनूर अन्सारी असे या आरोपीचे नाव असून तो बुधवारी सायंकाळी पळून गेला होता, मात्र रात्री उशिरा त्याला विलेपार्ले येथून अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. अटकेनंतर त्याला गुरुवारी अंधेरीतील स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अफजल हा अंधेरीतील सहार रोड, कबीरनगरमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. दोन दिवसांपूर्वी त्याला चोरीच्या गुन्ह्यात विलेपार्ले पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यात नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. बुधवारी दुपारी त्याला अंधेरीतील स्थानिक कोर्टात हजर करण्यात येणार होते. मात्र कोर्टात हजर करण्यापूर्वीच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. या घटनेनंतर त्याच्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अफजलचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच रात्री उशिरा अफजलला या पथकाने शिताफीने अटक केली. त्यानंतर त्याला चोरीसह कायदेशीर रखवालीतून पळून गेल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला पोलीस बंदोबस्तात गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायायीन कोठडीत पाठविले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here