घरमुंबईशिक्षक महिलेची हत्या करुन आरोपीची आत्महत्या

शिक्षक महिलेची हत्या करुन आरोपीची आत्महत्या

Subscribe

भांडुप येथे यास्मिता मिलिंद साळुंखे या 37 वर्षीय शिक्षक महिलेची हत्या करुन किशोर सावंत या इस्टेटने एका निवासी इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. या हत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही, मात्र या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यातून झालेल्या वादातून त्यानेच यास्मिताची हत्या केली, अटकेच्या भीतीने नंतर त्याने तेथीलच एका इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जाते.

याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येसह अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. यास्मिता ही व्यवसायाने शिक्षिका असून ती सध्या भांडुप येथील टँकरोड, वक्रतुंड पॅलेस इमारतीमध्ये राहत होती. किशोर सावंत हा तिच्या परिचित असून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होता. या वादानंतर तिने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. त्यातून त्यांच्यात अधिक खटके उडत होते. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता किशोर हा तिथे गेला होता. यावेळी त्याने यास्मिताची डोक्यात हातोड्याने बेदम मारहाण करुन हत्या केली.

- Advertisement -

या हत्येनंतर तो पळून गेला होता. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यास्मिताला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी दिपक पुंडलिक आंबेरकर याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी किशोर सावंतविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच सोमवारी रात्री आठ वाजता किशोरने भांडुपच्या कल्पतरु इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली.

इमारतीच्या स्थानिक रहिवाशांनी नंतर ही माहिती पोलिसांना दिली होती. हत्येच्या गुन्ह्यांत अटकेच्या भीतीने किशोरने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुुरु केला आहे. दरम्यान हत्या आणि आत्महत्येच्या या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -