घरमुंबईशिवजयंतीच्या खर्चाची रक्कम सीआरपीएफ फंडाला देणार

शिवजयंतीच्या खर्चाची रक्कम सीआरपीएफ फंडाला देणार

Subscribe

सकल मराठा समाज संघटनेची अभिनव घोषणा

मागील वर्षापासून ठाण्यात ‘एक शहर एक शिवजन्मोत्सव 2019’ चे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी उत्सवाचे दुसरे वर्ष असल्याने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार होता. मात्र, काश्मीरमध्ये घडलेल्या घटनेमुळे या वर्षीचा शिवजन्मोत्सव अत्यंत साधेपणाने करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त सायंकाळी काढण्यात येणारी भव्य मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सायंकाळी 6 वाजता काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. रात्रीचा स्नेहभोजनाचाही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेली मिरवणूक, दीपोत्सव आणि स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाची रक्कम सीआरपीफ फंडाला देण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाज, ठाणे मराठा क्रांती मोर्चा, ठाणे प्रणित सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मासुंदा तलावाजवळ करण्यात आले आहे, तर दुपारी 3 वाजता महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तसेच सकाळी 10 वाजल्यापासून आरोग्य शिबिर होणार असून, फिजिशियन डॉ. विठ्ठल पाटील, डॉ. राहूल तुपे, डॉ. शिवराज हुंगे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आरोही तासगावकर, डॉ. प्राजक्ता अहिरे, त्वचारोग तज्ज्ञ चित्रा नाईक या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी होणार आहे. तरी याचा लाभ जास्तीत जास्त ठाणेकरांनी घ्यावा, असे आवाहन समितीचे रमेश आंब्रे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -